शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ सांगली आवृत्तीचा उद्या वर्धापनदिन

By admin | Updated: March 24, 2017 00:20 IST

स्नेहमेळाव्याचे आयोजन : जिल्ह्यात दीड तपाची यशस्वी वाटचाल

सांगली : वाचकांशी असलेले विश्वासार्हतेचे घट्ट नाते जपत दीड तपाची यशस्वी वाटचाल करणाऱ्या ‘लोकमत’च्या सांगली आवृत्तीचा अठरावा वर्धापन दिन शनिवार, दि. २५ मार्चरोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने सांगलीत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वाचक, वृत्तपत्र विक्रेते, जाहिरातदार, हितचिंतक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रेमरूपी शुभेच्छांमुळे गेल्या अठरा वर्षांत ‘लोकमत’ने सांगली जिल्ह्यात सुदृढ वाचक चळवळ निर्माण केली. विश्वासार्हतेची ही परंपरा यापुढेही अखंडित ठेवण्याचे व्रत घेऊन ‘लोकमत’ परिवाराची वाटचाल सुरू आहे. विविध क्षेत्रांशी, वाचकांशी असलेले हे नातेसंबंध अधिक दृढ करण्याच्यादृष्टीने वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सांगलीतील माधवनगर रस्त्यावरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात शनिवारी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, वाचक, हितचिंतक, नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून स्नेह वृद्धिंगत करावा. पर्यावरण रक्षण व स्वच्छतेचा मंत्र जपताना पुष्पगुच्छ, पुष्पहाररूपी शुभेच्छांना फाटा देण्याचा निर्णय ‘लोकमत’ने घेतला आहे. त्यामुळे मेळाव्यास येणाऱ्यांनी पुष्पगुच्छ, पुष्पहार घेऊन येऊ नये, असे आवाहन ‘लोकमत’ परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)