शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

परजिल्ह्यांतील वाहनांवर टोल लावावा

By admin | Updated: December 27, 2015 01:27 IST

चंद्रकांतदादांचा सल्ला : रस्तेदुरुस्तीची कसरत होणार; टोल रद्दची उद्या अधिसूचना

 कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या लोकभावना लक्षात घेऊन ‘आयआरबी’चा टोल रद्द केला आहे; पण महा-नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या रस्त्यांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी पैसे उभे करताना महापालिकेची कसरत होणार आहे. त्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने परजिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांवर नाममात्र कर लावण्याचा विचार करावा, असा सल्ला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. याशिवाय ‘आयआरबी’ला द्याव्या लागणाऱ्या रकमेपैकी कोणताही बोजा सरकार कोल्हापूर महानगरपालिकेवर टाकणार नसल्याचा महत्त्वाचा खुलासाही चंद्रकांतदादांनी यावेळी केला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरचा टोल रद्द करण्याबाबत मंत्रिमंडळात आपले वजन सिद्ध केले आहे. टोल रद्दचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे प्रथमच शनिवारी कोल्हापुरात आले. कोल्हापुरातील अनेक संस्थांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले. टोल रद्द केल्याबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले, जनभावनेचा आदर करीत कोल्हापूरचा टोल रद्द केल्याबाबत मला समाधान वाटते. या टोल रद्दची विधानसभेत घोषणा झाली असली तरी निर्णयाबाबत येत्या उद्या, सोमवारी नगरविकास खात्यामार्फत अधिसूचना काढण्यात येणार आहे. टोल रद्द केल्यानंतर बैठकीत तामसेकर मूल्यांकन समितीचा अहवाल ग्राह्य धरण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, आयआरबी कंपनीला ४५९ कोटी रुपये देणार आहे; पण याचा कोणताही आर्थिक बोजा सरकार कोल्हापूर महापालिकेवर टाकणार नाही; पण महापालिकेने टेंबलाई टेकडी येथील आयआरबी कंपनीला दिलेली जागा राज्य रस्ते विकास महामंडळ आपल्या ताब्यात घेणार आहे. त्या जागेचा व त्यावरील बांधकामांवर मालकी हक्क हा रस्ते विकास महामंडळाचा राहणार आहे. टोल रद्द करण्यात आला असला तरीही महापालिकेला तयार रस्ते आपल्या ताब्यात मिळालेले आहेत. टोल रद्दचा निर्णय झाल्याने नियमानुसार आता याच तयार रस्त्यांचा दुरुस्ती-देखभालीचा खर्च महानगरपालिकेला करावा लागणार आहे. महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पाहता हा दुरुस्ती व देखभालीचा खर्च तिला परवडणारा नाही. या रस्त्यांवर वसुलीच्या केबिन्स तयार आहेत. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेने स्थानिक वाहनांव्यतिरिक्त परजिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांवर नाममात्र कर लावावा. त्यासाठी शासनही सहकार्य करील असेही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)