शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अवजड वाहनांनाच टोल

By admin | Updated: March 21, 2016 00:32 IST

चंद्रकांतदादा पाटील : सांगली-कोल्हापूर रस्त्याचे ९५ टक्के काम पूर्ण झाल्याशिवाय वसुलीला परवानगी देणार नाही; आंदोलन कशासाठी?

सांगली : एस.टी., स्कूल बसेस, छोट्या चारचाकींना टोलच लागणार नाही. त्यामुळे सांगलीत आंदोलन कशाकरिता केले जात आहे? असा सवाल उपस्थित करताना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी, सांगली-कोल्हापूर रस्त्यावर टोल सुरू राहण्याचे स्पष्ट संकेत रविवारी येथील कार्यक्रमात दिले. विश्रामबाग येथील स्फूर्ती चौक ते वृंदावन कॉलनी या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ रविवारी चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय कृती समितीने पालकमंत्र्यांना टोल रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, केवळ मोठ्या वाहनांनाच टोल लागणार आहे. तसेच ठेकेदार कितीही उड्या मारत असला तरी, ९५ टक्के काम पूर्ण झाल्याशिवाय टोलवसुली सुरू होऊ देणार नाही. टोल सुरू करण्याचे पत्र माझ्याच स्वाक्षरीने देण्यात येते. त्यामुळे सर्व गोष्टींची शहानिशा करूनच टोलला परवानगी दिली जाईल. केवळ अवजड वाहनांना टोल बसणार असल्याने, सांगलीमध्ये कोणत्या कारणासाठी आंदोलन सुरू आहे, हे (पान ११ वर)कामाची चौकशी करूसांगली-कोल्हापूर रस्त्याच्या संपूर्ण कामाची त्रयस्थ विभागामार्फत चौकशी केली जाईल. काम नियमानुसार झाले असेल तरच टोलसाठी परवानगी मिळेल; अन्यथा त्यांच्यावर कारवाई होईल. त्यामुळे याबाबत सांगलीकरांनी कोणतीही चिंता करू नये, असे स्पष्टीकरण पालकमंत्र्यांनी केले. तरीही टोल लागू शकतोकृती समितीने रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गात सांगली-कोल्हापूर रस्त्याचा समावेश करण्याची मागणी केली. यावर चंद्रकांतदादा म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गात या रस्त्याचा समावेश केला तरी, टोल लागू शकतो. वाहतूकदार संघटना नाराजपालकमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतर वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब कलशेट्टी म्हणाले की, आम्ही सांगली-कोल्हापूर रस्त्याला चौपदरी रस्ता म्हणायचे तरी कसे? हा रस्ता अजूनही अरुंद आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून टोल सुरू झाला, तर आमचा त्यास विरोध राहील.