शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

टोल वसुली सोमवारपासून

By admin | Updated: August 6, 2015 00:48 IST

कंपनीचे संकेत : स्थगितीची शासनाची मागणी न्यायालयाने फेटाळली

सांगली : न्यायालयीन निर्णयानुसार पोलीस संरक्षणासह ‘अशोका बिल्डकॉन’मार्फत येत्या सोमवारपासून सांगलीत पुन्हा टोल वसुलीला सुरुवात होणार आहे. टोल वसुलीच्या निर्णयाला स्थगिती मिळावी म्हणून शासनाच्यावतीने केलेली मागणी बुधवारी तदर्थ जिल्हा व सत्रन्यायाधीश जी. एस. शेगावकर यांनी फेटाळली. त्यामुळे कंपनीने टोल वसुलीसाठीची तयारी सुरू केली आहे. येथील आयर्विन पुलाच्या पर्यायी पुलावरील टोलसाठी कंपनीने केलेल्या दरखास्तीसंदर्भात न्यायालयाने सोमवारी निकाल दिला होता. त्यानुसार कंपनीला वाढीव खर्चासाठी १६ वर्षे ९ महिने टोलवसुली करता येणार आहे. न्यायालयाच्या निकालाचे वृत्त समजताच सरकारच्यावतीने बुधवारी येथील तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. वरिष्ठ न्यायालयात याबाबत दाद मागणार असल्याने, न्यायालयाने या निकालास स्थगिती द्यावी, अशी मागणी सरकारच्यावतीने करण्यात आली. त्याचवेळी कंपनीच्यावतीने अ‍ॅड. एस. एस. शेठ यांनी स्थगिती अर्ज फेटाळण्याची मागणी केली. न्यायालयाने शासनाचा अर्ज फेटाळला. याबाबतची माहिती अ‍ॅड. शेठ यांनी बुधवारी सायंकाळी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पोलीस संरक्षणाच्या मागणीसाठी अर्ज केला जाणार आहे. कंपनीला पोलीस संरक्षण देण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. त्यानुसार अर्ज करून कंपनी पोलीस संरक्षणाची मागणी करणार आहे. पोलीस संरक्षण मिळाल्यानंतर लगेचच येत्या सोमवारपासून टोल वसुलीला सुरुवात केली जाणार आहे. कंपनीने टोल वसुलीसंदर्भातील तयारी सुरू केली आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून टोलनाके पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. जानेवारी २0१४ मध्ये शासनाच्या तोंडी आदेशानंतर व आंदोलकांच्या रेट्यामुळे येथील दोन्ही टोलनाके बंद करण्यात आले होते. १९ महिन्यांच्या कालावधीनंतर आता पुन्हा हे नाके पूर्ववत सुरू होणार आहेत. (प्रतिनिधी) आता व्याजाचाही प्रश्न अशोका बिल्डकॉन कंपनीने १ कोटी २० लाखांच्या वाढीव खर्चाचा व महापुरात झालेल्या नुकसानीचा दावा केला होता. त्या दाव्यानुसार कंपनीने टोलवसुलीस मुदतवाढ मागितली होती. त्यानंतर लवादाने कंपनीच्या बाजूने निर्णय दिला. यासंदर्भात आणखी एक लवाद नेमण्यात आला होता. त्या लवादाने शासनाच्या बाजूने निकाल दिला होता. पहिल्या लवादानुसार न्यायालयीन लढाई कंपनीने जिंकली होती. त्यानंतर आता दरखास्तीनुसार न्यायालयाने टोलसंदर्भातील निकाल दिला आहे. आता शासनाकडून नुकसानभरपाई देण्याचा विषय पुढे आला तरी, कंपनीने केलेली वाढीव खर्चाची मागणी जुनी असल्याने त्यावरील व्याजाचाही प्रश्न निर्माण होणार आहे. कंपनीनेही व्याजाचा मुद्दा उपस्थित केला आहे.