शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

टोलप्रश्नी आज मुंबईत बैठक

By admin | Updated: November 18, 2015 00:01 IST

चंद्रकांतदादा पाटील : मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

कोल्हापूर : कोल्हापूरच्या टोलप्रश्नी आज, बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होत असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. ही बैठक मंगळवारी होणार होती; परंतु ती आता आज होत आहे.मंगळवारी पालकमंत्री पाटील यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मोप्पलवार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांच्याशी सुमारे दोन तास चर्चा केली. या प्रकरणाचा सुवर्णमध्य काय असू शकतो, यासंबंधीच्या विविध पर्यायांवर चर्चा झाली. आज, बुधवारी मुख्यमंत्र्यांसमवेत त्यासंबंधी चर्चा करून नोव्हेंबरअखेरीस हा प्रश्न संपवू, अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.कोल्हापुरात ‘आयआरबी’ कंपनीने २४० कोटी रुपये खर्चून केलेल्या एकात्मिक रस्ते प्रकल्पाची किंमत किती व कुणी द्यायची हा निर्णय सध्या प्रलंबित आहे. राज्य शासनाने महापालिका निवडणुकीच्या आधी टोलवसुलीस तीन महिन्यांची स्थगिती दिली. तिची मुदत येत्या २६ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे ही मुदत संपल्यावर कंपनी पुन्हा टोलवसुली सुरू करणार काय, ही साशंकता टोलविरोधी कृती समितीला व लोकांच्याही मनात आहे; परंतु पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मात्र कोल्हापुरात पुन्हा टोल लागू होणार नाही, असे निक्षून सांगितले आहे. या वादग्रस्त प्रकल्पाबद्दल तक्रारी झाल्यावर शासनाने वेळोवेळी सहा समित्या स्थापन केल्या. त्यांचे अहवालही शासनाकडे सादर झाले आहेत. कंपनीला ठरावीक रक्कम उचलून देऊन कोल्हापूरची टोलमधून मुक्तता करण्याचा शासनाचा निर्णय आहे; परंतु ही ठरावीक रक्कम म्हणजे किती, ती द्यायची झाली तर कशी देणार, ती कंपनीला मान्य होईल का, अशा काही प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांसमवेतच बैठक होणार होती; परंतु काही कारणांमुळे ही बैठक मंगळवारी झाली नाही. (प्रतिनिधी)