शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

टोलप्रश्नी रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्धार

By admin | Updated: March 28, 2016 00:53 IST

टोलविरोधी कृती समितीची बैठक : ४ एप्रिलला जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाला निवेदन देणार

जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर महामार्गावरील टोलनाक्याला तीव्र विरोध दर्शविण्यासाठी येत्या ४ एप्रिलला जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्याबरोबरच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना टोलप्रश्नी साकडे घातले जाणार आहे़ पालकमंत्र्यांकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास रस्त्यावरची लढाई करण्याचा निर्धार टोलविरोधी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने करण्यात आला़ यावेळी टोलला कायम विरोध करीत सांगली-कोल्हापूर महामार्ग हा रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गात विलिनीकरण करावा़ जयसिंगपूर व हातकणंगले येथे उड्डाणपूल उभारण्यात यावा, तसेच सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यापक कृती समितीची स्थापना करण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष युवराज शहा होते़ येथील नगरपालिकेच्या दे़ भ़ रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहात रविवारी टोलविरोधी सर्वपक्षीय कृती समितीची बैठक झाली़ यावेळी आमदार उल्हास पाटील म्हणाले, शासनाकडून शिरोळ तालुक्यात टोलचा तिसऱ्यांदा प्रयत्न झाला आहे़ येथील जनतेने नेहमीच टोलला विरोध केला आहे़ शिरोली व अंकली येथे होणारे टोलनाके हद्दपार करून टाकण्यासाठी सर्वपक्षीय लढ्याची गरज आहे़ मी सत्तेतील आमदार असलो तरी प्रथम चळवळीचा कार्यकर्ता म्हणून तुमच्या या लढ्यात अग्रभागी राहणार आहे़ टोल द्यायचा नाही आणि मागेही हटायचे नाही, असा निर्धार करून कोल्हापूरप्रमाणेच हाही टोल हाणून पाडण्याचे आवाहन त्यांनी केले.शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, टोलविरोधी लढा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी संघटितपणे लढा देऊन टोलचे भूत हाणून पाडण्यासाठी शासनाशी भांडू व टोल हद्दपार करू.शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सतीश मलमे म्हणाले, कोल्हापूरप्रमाणेच हाही टोल हाणून पाडण्यासाठी संघटित लढा उभारणे गरजेचे आहे़ रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असताना टोल कशासाठी? टोल बंद करण्यासाठी मंत्र्यांच्या गाड्याही अडवायला शिवसेना मागे-पुढे बघणार नाही़ ‘स्वाभिमानी’चे जिल्हा परिषद सदस्य सावकर मादनाईक म्हणाले, चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे़ त्यातच टोलची घाई असलेल्या कंपनीनेच रस्त्याचा दर्जा तपासावा. मगच टोल उभारणीला हात घालावा़ टोलला टोला देण्यासाठी शिरोळची जनता सज्ज आहे़ कॉ़ रघुनाथ देशिंगे म्हणाले, टोलमुक्तीचे आश्वासन देऊनच सरकार सत्तेवर आले आहे़ टोल सर्वसामान्य नागरिकांच्या मानगुटीवर बसविण्याचे काम शासन करीत आहे़ त्यामुळे या सरकारने टोलमुक्तीची घोषणा लक्षात घेऊन या मार्गावरील टोलनाका रद्द करावा; अन्यथा जनता टोलनाका उधळून लावेल. अ‍ॅड़ संभाजीराजे नाईक, मिलिंद भिडे, राजेंद्र दार्इंगडे, बाळासाहेब कलशेट्टी, रमेश शिंदे, पृथ्वीराज पवार, भगवान जांभळे, दिलीप माणगावे, चंद्रकांत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दरगू गावडे, धनाजी चुडमुंगे, प्रकाश झेले, शैलेश आडके, सूरज भोसले, प्रकाश पाटील-टाकवडेकर, साजिदा घोरी, मधुकर पाटील, मिलिंद साखरपे, बजरंग खामकर यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)