शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
4
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
5
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
6
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
7
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
8
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
9
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
10
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
11
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
12
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
13
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
14
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
15
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
16
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
17
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
18
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
19
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
20
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

टोलप्रश्नी आज पुन्हा कोेल्हापुरात अघोषित बंद!

By admin | Updated: June 9, 2014 01:13 IST

शहर एकवटणार : ‘टोल देणार नाही’चा घुमणार नारा; सर्वपक्षीय महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

कोल्हापूर : ‘टोल आम्ही देणार नाही’चा नारा देत उद्या, सोमवारी अवघ्या कोल्हापूरकरांनी रस्त्यांवर उतरण्याची तयारी केली आहे. उद्या सकाळी दहा वाजता गांधी मैदानावरून निघणारा हा टोलविरोधी महामोर्चा दुपारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकेल. आजी-माजी आमदार, खासदार, सर्व राजकीय संघटना, रिक्षांसह सर्वच वाहनचालक संघटना, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, वकील, उद्योजक, सामाजिक संघटनांनी महामोर्चास जाहीर पाठिंबा दिला आहे. टोलविरोधात जनतेचा रोष असून, मागील दोन मोर्चांप्रमाणे यावेळीही कोल्हापूरकर सर्व व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेवून पाठिंबा देणार आहेत. यामुळे उद्या कोल्हापुरात अघोषित बंद असणार आहे.सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने जिल्हा व शहरभर जागरण मेळावे घेऊन टोलविरोधी वातावरण तयार केले आहे. जानेवारीत टोलनाक्यांची राख करूनही पुन्हा ‘आयआरबी’ने टोल सुरू करण्याची तयारी सुरू केल्याने जनतेत टोलविरोधी प्रचंड रोष आहे. परिणामी, उद्याच्या मोर्चात उतरून कोल्हापूरकरांनी नाराजी व्यक्त करण्याची तयारी केली आहे. या मोर्चात दोन खासदार, अर्धा डझन आमदार, अनेक माजी खासदार व आमदारांसह सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. आजी-माजी खासदार, आमदारांसह ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील व गोविंद पानसरे, महापौर सुनीता राऊत, कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखेंसह समितीचे पदाधिकारी व नगरसेवक महामोर्चाच्या अग्रभागी असणार आहेत. टोलविरोधातील अंतिम टोला देण्यासाठी कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्तपणे मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केले आहे. टोलविरोधी उद्या, सोमवारी निघणाऱ्या महामोर्चात कागल मतदारसंघासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्यकर्ते अग्रभागी असतील, अशी माहिती राज्याचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. दरम्यान, या महामोर्चाला पूर्ण पाठिंबा आहे. सर्व कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे. (प्रतिनिधी)