कोल्हापूर : राज्यातील बाजार समितीमध्ये इलेक्ट्रॉनिक काट्यावर वजन केलेल्या शेतमालाची तोलाई आकारू नये, या पणन संचालकांच्या आदेशाला अखेर आज, मंगळवारी पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्थगिती दिली. या निर्णयामुळे तोलाईदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून, कोल्हापूर बाजार समितीत सर्वच शेतीमालाचे सौदे आज पूर्ववत सुरू झाले. शेतकऱ्यांकडून अडत वसुली न करता व्यापाऱ्यांकडून करावी; तसेच इलेक्ट्रॉनिक काट्यावर वजन केलेल्या शेतमालाची तोलाई आकारू नये, हे दोन महत्त्वपूर्ण निर्णय पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी दोन दिवसांपूर्वी घेतले होते. याविरोधात व्यापाऱ्यांनी सौदे बंद केल्याने पणनमंत्र्यांनी निर्णयाला स्थगिती दिली. त्यानंतर सौदे पूर्ववत सुरू झाले; पण ‘तोलाई रद्द’मुळे तोलाईदार आक्रमक झाले. तथापि, आज सकाळपासून सौदे पूर्ववत सुरू झाले. दुपारी पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तोलाईच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने सौद्यांबाबतचा पेच बऱ्यापैकी संपला.सर्वाधिक आवकबाजार समितीत आठ दिवस गुऱ्हाळघरे बंद असूनही गुळाच्या हंगामातील सर्वाधिक गूळ रव्यांची आवक झाली होती. आज तब्बल ६२ हजार ५३६ गूळ रव्यांची विक्री करण्यात आली. आवक जास्त असली तरी सरासरी दर ३२०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. अशी झाली गुळाची विक्री प्रतदर प्रतिक्ंिवटलसरासरीस्पेशल३९०० ते ४१२५४००० रुपयेनंबर -१३५०० ते ३८९०३७५० रुपयेनंबर-२३१०५ ते ३४९०३२०० रुपयेनंबर-३२८५० ते ३१००३००० रुपयेनंबर-४२७०० ते २८४०२७५० रुपये१ किलो२६०० ते ३६००३२५० रुपये
‘तोलाई रद्द’लाही अखेर स्थगिती
By admin | Updated: December 24, 2014 00:21 IST