शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

टोलप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत उद्या बैठक

By admin | Updated: May 22, 2015 00:48 IST

सरकारचे चर्चेचे निमंत्रण : टोलविरोधी कृती समितीने स्वीकारले

कोल्हापूर : शहरांतर्गत आकारल्या जाणाऱ्या टोलला राज्य सरकारने सुचविलेला पर्याय स्पष्टपणे फेटाळून लावल्यानंतरही सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीसोबत चर्चा करण्यास राज्य सरकारची तयारी आहे. यासंदर्भात चर्चेतून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी कोल्हापुरात बैठक बोलावली असून चर्चेचे निमंत्रण कृती समितीनेही स्वीकारले आहे. शनिवारी दुपारी चार वाजता राम गणेश गडकरी सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि सर्वपक्षीय कृती समितीचे २० निवडक सदस्य यांच्यात बैठक होणार आहे. चर्चेतून काय मार्ग निघणार आहे यावर पुढील दिशा ठरविली जाईल. जर सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला नाही तर त्याच दिवशी त्याच ठिकाणी आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे कृती समितीतर्फे सांगण्यात आले.कृती समितीचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी पत्रकारांना सांगितले की, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा बुधवारी सायंकाळी मला फोन आला. त्यावेळी त्यांनी शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची कृती समितीसोबत चर्चा करण्याची तयारी आहे, असा निरोप सांगितला; परंतु चर्चेला जायचे की नाही, यावर कृती समितीतील सर्व सदस्यांशी सल्लामसलत करूनच काय ते सांगतो, असे त्यांना उलट निरोप दिला. बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी कृती समितीच्या सर्वच घटक पक्षांशी चर्चा केल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन चर्चेला जाण्याचा निर्णय घेतला. ‘चर्चेतून मार्ग निघतो,’ ही आमची भावना आहे. त्यामुळे आम्ही शनिवारी चर्चेला जाणार आहोत शिवाय आम्हाला मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही. प्रा. पाटील यांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वी सरकारच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘एम एच ०९’ वाहने वगळण्याचा पर्याय आम्हाला सांगितला होता परंतु आम्ही तो नाकारला आहे. आता सरकार आणखी पुढे जाऊन मोठी वाहने तसेच मालक कोल्हापूरचा आणि वाहन बाहेर जिल्ह्यातील आहेत अशांनाही वगळण्याचा पर्याय सांगितला आहे परंतु आमचं तर म्हणणे असं आहे की, कोल्हापूरमध्ये आयआरबीचा एकही टोलनाका राहता कामा नये. चर्चेला आम्ही जाऊ पण विनापर्याय टोल रद्द, ही आमची मागणी कायम राहील. टोल कायमचा घालविणे हीच सरकारची भूमिका आहे. सर्वाेच्च न्यायालयाने टोलवसुलीस दिलेली स्थगिती उठविल्याने टोलविरोधी कृती समितीच्या मागणीनुसार टोलवसुलीस सरकारने स्थगिती दिल्यास तो न्यायालयाचा अवमान होईल.- चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्रीसरकारसोबत चर्चेला जातोय याचा अर्थ आम्ही टोलचा कोणताही पर्याय स्वीकारलेला नाही अथवा स्वीकारणारही नाही. कोल्हापुरातून सर्व टोलनाके उचलून नेले पाहिजेत यावर आम्ही अद्यापही ठाम आहोत.- प्रा. एन. डी. पाटील, ज्येष्ठ नेते