शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
4
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
5
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
6
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
7
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
8
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
9
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
10
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
11
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
12
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
13
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
14
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
15
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
16
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
17
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
18
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
19
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
20
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

हातकणंगलेत दोन्ही कॉँग्रेस एकत्र

By admin | Updated: April 30, 2015 00:42 IST

जिल्हा बँक : जनसुराज्य पक्षाची गोची

आयुब मुल्ला -खोची -जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निमित्ताने कॉँग्रेस-राष्ट्रवादीला तालुक्यात एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. शाहू विकास आघाडीकडून एक जागा बिनविरोध व दोन ठिकाणी उमेदवारी अशी कॉँग्रेसची, तर फक्त एकच जागा राष्ट्रवादीला मिळाली आहे; परंतु या आघाडीबरोबर असणाऱ्या जनसुराज्यपक्षाची मात्र गोची झाली आहे. त्यामुळे आवळे यांना मिळून ते आघाडीधर्म पाळतील का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शाहू विकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या कोट्यातून महिला गटांतून माजी खासदार निवेदिता माने, अनुसूचित जाती-जमाती गटांतून माजी खासदार जयवंतराव आवळे यांचे पुत्र राजू आवळे, तर इतर मागास गटांतून आवाडे गटाचे विलासराव गाताडे यांना उमेदवारी मिळाली आहे. संस्था गटातून आमदार महाडिक बिनविरोध झाले आहेत. म्हणजे राष्ट्रवादीला एक, तर कॉँग्रेसला तीन जागा असे चित्र निर्माण झाले आहे. विलास गाताडे वगळता वरील तिन्ही नेते बॅँकेचे गेल्यावेळी संचालक होते. विशेष म्हणजे निवेदिता माने अध्यक्ष, तर राजू आवळे उपाध्यक्ष म्हणून पहिल्यादांच त्यांना संधी मिळाली. गेल्यावेळी निवडणूक चुरशीने झाली होती. ती परिस्थिती सध्या दिसत नाही. कारण माघारीच्या अंतिम दिवशीच चार जागा बिनविरोध झाल्या. महिला गटातील दोन जागाही बिनविरोध होत होत्या. परंतु, माघारीसाठी पंधरा मिनिटे उशीर झाला. त्यामुळे जयश्री रेडेकर (गडहिंग्लज), सुजाता सातवणेकर (चंदगड) यांचे अर्ज राहिले. अन्यथा, निवेदिता माने व उदयानी साळोखे या शाहू विकास आघाडीच्या महिला उमेदवार बिनविरोध झाल्या असत्या.विशेष म्हणजे विरोधी गटानेच भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर व आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या नेतृत्वाखाली सहा उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये स्वत: मिणचेकर हे अनुसूचित जाती-जमाती गटातून उभे आहेत. तर सुधीर मुंज हे इतर मागास गटांतून उभे आहेत. मिणचेकर यांचे विरोधक राजू आवळे आहेत. तसेच ‘जनसुराज्य’चे विरोधक मिणचेकर व राजू आवळे हे दोघे अहेत. त्यामुळे जनसुराज्य कोणाचे समर्थन करणार? हा प्रश्न आहे. विनय कोरे मात्र शाहू विकास आघाडीबरोबर आहेत. त्यामुळे त्यांना आघाडी म्हणून राजू जयवंतराव आवळे यांचे समर्थन करावे लागेल. अन्यथा, या जागेबाबत काहीही न बोलता ते कार्यकर्त्यांना स्वातंत्र्यही देऊ शकतील अशी स्थिती आहे.या निवडणुकीने जास्त ताणाताण होईल, असे चित्र नाही. दोन्ही कॉँग्रेस एकत्रित काम करीत आहेत. परंतु, तालुक्यात मात्र ‘जनसुराज्य’ची संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.