शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पेठवडगावमध्ये यादव विरोधात सर्व एकत्र

By admin | Updated: October 22, 2016 01:31 IST

सत्ताधारी-विरोधकांची मोर्चेबांधणी : निवडणुकीत उमटणार विधान परिषदेचे पडसाद; फटाके कोण वाजवणार याची उत्सुकता

सुहास जाधव -- पेठवडगांवपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी यादव आघाडीस रोखण्यासाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शहरातील यादव विरोधी सर्व गट एकत्र येऊन महाआघाडीच्या घोषणा झाली आहे. मात्र, डॉ. अशोक चौगुले यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यातच आहे. महाआघाडीत डॉ. चौगुले सहभागी होणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे, तर माजी आमदार महादेवराव महाडिक विधान परिषदेच्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी यादव आघाडीच्या विरोधात सक्रिय झाले आहेत.वडगाव नगरपालिकेची २७ नोेव्हेंबरला निवडणूक होणार आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षण आहे. सध्या यादव आघाडीविरोधात महाआघाडी अशी दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला शहरामध्ये पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढवावी, असा आग्रह आहे. मात्र, महाआघाडी व्हावी यासाठी भाजपबरोबर चर्चेच्या फेरी सुरू आहेत. याबाबत अधिकृत भूमिका भाजपने जाहीर केलेली नाही, हा मुद्दा प्रतिष्ठेचा झाला आहे.गतनिवडणुकीत सत्तारूढ यादव आघाडीचे नेतृृत्व विजयसिंह यादव व विद्या पोळ यांनी केले होते, तर विरोधी युवक क्रांती, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व प्रविता सालपे, रंगराव पाटील यांनी तर वडगाव शहर विकास आघाडीची धुरा डॉ. अशोक चौगुले यांनी सांभाळली होती. अशी २०११च्या निवडणुकीसाठी तिरंगी लढत झाली होती. यामध्ये यादव गटाने १७ पैकी १३ जागांवर विजय संपादन करून सत्ता कायम राखली होती, तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागांवर समाधान मानावे लागले होते. याचबरोबर वडगाव शहर विकास आघाडीने १७ पैकी १७ जागा लढविल्या होत्या. त्यामध्ये यश मिळाले नाही. मात्र, काही ठिकाणी लक्षणीय मते घेतली होती.दरम्यान, यादव आघाडीचे देवदास पोळ व यादव गटाचे नेतेविजयसिंह यादव यांचे निधन झाले. त्यामुळे दोनवेळा पोटनिवडणूक झाली. या दोन्ही निवडणुकीत यादव आघाडीच्या विरोधात एकास एक लढतीचे नियोजन करण्यात आले होते. विजयसिंह यादव यांच्या पश्चात झालेल्या पोटनिवडणुकीत यादव आघाडीला विरोधी गटांनी एकत्र येत चांगलेच आव्हान निर्माण केले होते.याचवेळी सत्ताधारी यादव आघाडीच्या विरोधात महाआघाडी केल्याशिवाय चांगला पर्याय देऊ शकत नाही अशी जाणीव झाल्यामुळे महाआघाडी करण्यासाठी सर्व एकवटले आहेत. दरम्यानच्या काळात डॉ. अशोक चौगुले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रवेशामुळे डॉ. चौगुले यांना स्वत:हून भूमिका जाहीर करण्यात अडचणी येत आहेत.विजयसिंह यादव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत यादव आघाडीच्या कारभाऱ्यांनी अविश्वासाचे वातावरण उभे केले. त्यामुळे नाराज झालेले यादव गटाचे खंदे समर्थक नगरसेवक विश्रांत माने यांनी यादव गटापासून फारकत घेण्यास सुरुवात केली. तसेच स्वीकृत नगरसेवक संजय जाधव हेही अलिप्त आहेत. याचबरोबर उपनगराध्यक्ष मोहनलाल माळी हे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होते, पण त्यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळणार नाही अशी शक्यता वाटल्यामुळे ते यादव आघाडीतून बाहेर पडले आहेत.यादव गटाच्या विरोधात नाराजांची मोट बांधण्यासाठी प्रविता सालपे, आर. डी. पाटील, अजय थोरात सक्रिय आहेत. त्यांना माजी आमदार महादेवराव महाडिक यांची साथ मिळाली आहे, तर विरोध गृृहीत धरून विकासकामांच्या पाठबळावर नगराध्यक्षा विद्या पोळ, गुलाबराव पोळ यांनी जलतरण तलाव व जलशुद्धिकरण केंद्राच्या उद्घाटनाच्या निमित्ताने प्रचारास प्रारंभ केला. युवक क्रांती आघाडीतून नाराज झालेले माजी उपनगराध्यक्ष धनाजी पाटील, सुभाष माने, रमेश दाभाडे आदी कार्यकर्ते यादव आघाडीत सहभागी झाले आहेत. यादव गटाने निवडणूकपूर्व प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र, नगराध्यक्ष आरक्षणानंतर व उमेदवार निवडीवरून ब्रेक लागल्याचे चित्र आहे.नगराध्यक्षपद इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे. सत्तारूढ यादव गटांकडून राजन शेटे, सुनील हुक्केरी, युवक क्रांती आघाडीकडून रमेश बेलेकर, प्रकाश बुचडे, संतोष गाताडे, तर पीटीएमकडून विश्रांत माने, मोहनलाल माळी, भाजपकडून डॉ. अशोक चौगुले, तय्यब कुरेशी, सुधाकर पिसे, आदी इच्छुक आहेत.