शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

डॉल्बीविरोधात आज मूकमोर्चा-- कोल्हापूरकर रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शांतताप्रिय नागरिकांच्यावतीने आज, शनिवारी सकाळी १० वाजता मिरजकर तिकटी येथून डॉल्बी विरोधात मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यंदाची विसर्जन मिरवणूक डॉल्बीविरहित करण्याचा विडा उचलला आहे. त्यास काही विघ्नसंतोषी घटक संकुचित राजकीय फायद्याचा विचार करून विरोध करत आहेत. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आणि ‘डॉल्बी नकोच’ ...

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या मोहिमेस पाठबळया मोहिमेला साथ देऊया. संघटित होऊन शिस्तबद्ध रॅली काढूया’ असे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शांतताप्रिय नागरिकांच्यावतीने आज, शनिवारी सकाळी १० वाजता मिरजकर तिकटी येथून डॉल्बी विरोधात मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यंदाची विसर्जन मिरवणूक डॉल्बीविरहित करण्याचा विडा उचलला आहे. त्यास काही विघ्नसंतोषी घटक संकुचित राजकीय फायद्याचा विचार करून विरोध करत आहेत. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आणि ‘डॉल्बी नकोच’ ही कोल्हापूरची जनभावना असल्याचे दाखविण्यासाठी ही फेरी काढण्यात येत असल्याचे संयोजकांच्यावतीने सांगण्यात आले.मिरजकर तिकटीपासून सुरू होणारा हा मोर्चाची शिवाजी चौकात सांगता होईल. या मोर्चामध्ये सहभागी तरुणी डॉल्बी दुष्परिणामांची माहिती देतील. या मूकमोर्चामध्ये समाजातील मान्यवर, डॉक्टर, वकील, तालीम संस्था, रिक्षा संघटना, महिला संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, व्यापारी, उद्योजक, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, शाळा-कॉलेज विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिक सहभागी होणार आहेत. हा मोर्चा अराजकीय आहे. ज्या-ज्या घटकांना डॉल्बी नको असे वाटते त्यांनी यात सहभागी होऊन कोल्हापूरची विधायक ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन केले आहे.एकतेची ताकद, आवाजापेक्षा मोठी‘डॉल्बी नको, डॉल्बी मुक्त कोल्हापूर’साठी शनिवारी सकाळी मिरजकर तिकटी ते शिवाजी पुतळा अशी मूक रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीच्या समर्थनात शुक्रवारी दिवसभर शहरात ‘एकतेची ताकद, आवाजापेक्षा मोठी’ अशाप्रकारची पत्रके वाटण्यात आली. या पत्रकात आपल्या शहराचा नावलौकीक टिकविण्यासाठी पुढे येऊ या गणेशोत्सव काळात डॉल्बी लावू नये ही प्रशासनाने घेतलेली भूमिका योग्य आहे. असे वाटत असले तर चला, आपलं कोल्हापूर आपलं आहे. डॉल्बीपासून मुक्ती ‘या मोहिमेला साथ देऊया. संघटित होऊन शिस्तबद्ध रॅली काढूया’ असे आवाहन करण्यात आले.