शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘आयकॉन्स आॅफ साऊथ महाराष्ट्र’चे आज प्रकाशन

By admin | Updated: November 18, 2014 23:32 IST

कोल्हापुरात सोहळा : विजय दर्डा, अभिनेता अजय देवगण यांची उपस्थिती

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भागीदारी केलेल्या व आपापल्या क्षेत्रांत मानदंड ठरलेल्या व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडणारे ‘आयकॉन्स आॅफ साऊथ महाराष्ट्र’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन उद्या, बुधवारी सकाळी साडेदहा वाजता होत आहे. अभिनव अशा या पुस्तकाचे प्रकाशन ख्यातनाम अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता अजय देवगण यांच्या हस्ते होत आहे. ‘लोकमत’ मीडिया गु्रपचे चेअरमन व ज्येष्ठ खासदार विजय दर्डा प्रमुख उपस्थित असतील. शिरोली औद्योगिक वसाहतीतील ‘लोकमत’च्या मुख्य कार्यालयात हा शानदार सोहळा होत आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत दक्षिण महाराष्ट्राचे स्वातंत्र्यलढ्यापासून ते आजपर्यंत वेगळे योगदान आहे. या परिसराने अनेक बाबतीत महाराष्ट्राला दिशा दिली आहे. उत्तम शेती, सहकारी साखर कारखानदारी, दूध उद्योग, फौंड्री आणि सुटे भाग बनविणारी इंडस्ट्री, कला, क्रीडा, चित्रपटापासून ते लाल मातीतल्या कुस्तीपर्यंत या परिसराने देशाला व महाराष्ट्राला नेतृत्व दिले आहे. अशाच उज्ज्वल परंपरेतील काही मोजक्या प्रातिनिधिक व्यक्तींच्या जीवनकार्याचा आलेख या पुस्तकाच्या निमित्ताने समाजासमोर नव्याने मांडला जात आहे. उद्योग, व्यापार, वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रांतील उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर लखलखीत प्रकाश टाकण्याचाच हा प्रयत्न आहे. त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळू शकेल. अभिनेते अजय देवगण या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापुरात येत असल्याने त्यांच्याबद्दल तरुणाईमध्ये मोठी उत्सुकता आहे. त्यांचे ‘सिंघम रिटर्न्स..’मधील ‘आता माझी सटकली...’ही कॅचलाईन प्रत्येकाच्या जीभेवर आहे. या कॅचलाईनलाही कोल्हापूरच्या रगेलपणाचा व मातीचा वास आहे. त्याअर्थानेही कोल्हापूर व देवगण यांची ‘केमिस्ट्री’ एक आहे. हा सोहळा फक्त निमंत्रितांसाठीच राखीव आहे.प्रयोगशील, व्रतस्थ ५१ व्यक्तिमत्त्वांचा गौरवदक्षिण महाराष्ट्रातील जिद्दी, प्रयोगशील आणि व्रतस्थ अशा ५१ व्यक्तिमत्त्वांचा गौरवच या ‘आयकॉन्स आॅफ साऊथ महाराष्ट्र’ या बुकच्या माध्यमातून ‘लोकमत’ने केला आहे.असा असेल सोहळा‘आयकॉन्स आॅफ साऊथ महाराष्ट्र’ कॉफी टेबल  बुकचे प्रकाशनवेळ : १०. ३० वाजता ४स्थळ : ‘लोकमत भवन, औद्योगिक वसाहत, शिरोली कोल्हापूर