शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हिटणी येथे कुंभोत्सव अमाप उत्साहात आज कळस मिरवणूक : हत्ती-घोडे खास आकर्षणाचा केंद्रबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:44 IST

गडहिंग्लज : हिटणी (ता. गडहिंग्लज) येथील जागृत देवस्थान श्री बसवेश्वर मंदिर वास्तुशांती व कलशारोहण सोहळ्यानिमित्त सुवासिनींनी काढलेली मंगल कळस मिरवणूक (कुंभोत्सव) अमाप उत्साहात पार पडली. आज, शनिवारी मंदिराच्या सुवर्ण कळसाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीतील हत्ती-घोडे खास आकर्षण ठरले आहे.सकाळी साडेनऊ वाजता नदीघाटावरील मंदिरापासून कुंभोत्सवाला सुरुवात झाली. गावातील प्रमुख मार्गावर ...

गडहिंग्लज : हिटणी (ता. गडहिंग्लज) येथील जागृत देवस्थान श्री बसवेश्वर मंदिर वास्तुशांती व कलशारोहण सोहळ्यानिमित्त सुवासिनींनी काढलेली मंगल कळस मिरवणूक (कुंभोत्सव) अमाप उत्साहात पार पडली. आज, शनिवारी मंदिराच्या सुवर्ण कळसाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीतील हत्ती-घोडे खास आकर्षण ठरले आहे.सकाळी साडेनऊ वाजता नदीघाटावरील मंदिरापासून कुंभोत्सवाला सुरुवात झाली. गावातील प्रमुख मार्गावर फिरून दुपारी मंदिराच्या आवारात मिरवणुकीची सांगता झाली. सजविलेल्या खास वाहनातून श्री प्रभूलिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजी आणि अभिनव वप्पतेश्वर महास्वामी हेही कुंभोत्सवात सहभागी झाले होते.कुंभोत्सवानिमित्त मिरवणूक मार्गासह प्रत्येक गल्लीत दारोदारी आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. कुंभोत्सवात सहभागी महिलांना ठिकठिकाणी सरबत वाटण्यात आले. फुलांच्या पाकळ्यांच्या पायघड्या घालण्यात येत होत्या. तब्बल तीन तासांनंतर मिरवणुकीची सांगता झाली. त्यानंतर महाप्रसाद झाला.आज, शनिवारी मंदिराच्या सुवर्ण कळसाची मिरवणूक, रविवारी कळसपूजा व महारुद्राभिषेक आणि त्यांनतर श्रीशैल मठाचे जगद्गुरूडॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य यांची गावातून सवाद्य मिरवणूक होईल. सोमवारी दुपारी कलशारोहण होईल.गावकऱ्यांची एकजूट, माहेरवाशिणी दाखलआपापसातील सर्व मतभेद विसरून सर्व गावकरी या सोहळ्यात मनापासून सक्रिय सहभागी झाले आहेत. त्याचप्रमाणे सर्व माहेरवाशिणीदेखील ऐतिहासिक सोहळ्यासाठी आवर्जून ‘माहेर हिटणी’त दाखल झाल्या आहेत.