शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधींसमवेत कॉरिडॉरसंबंधी आज बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2016 00:36 IST

‘स्मॅक’चा पुढाकार : आंदोलनाची दिशा ठरणार

कोल्हापूर : मुंबई-बंगलोर कॉरिडॉर आणि कऱ्हाड-बेळगाव रेल्वेमार्ग हे प्रकल्प कोल्हापूरच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरणारे आहेत. यातून कोल्हापूरला वगळल्याने त्याचा फटका जिल्ह्याच्या विकासाला बसणार आहे. त्या दोन्ही प्रकल्पांमध्ये कोल्हापूरचा समावेश व्हावा, यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज, रविवारी दुपारी तीन वाजता बैठक होत आहे. शिरोली औद्योगिक वसाहतीतील स्मॅकच्या सभागृहात ही बैठक होत असून, त्यास जिल्ह्यातील खासदार व आमदारांना निमंत्रित करण्यात आले आहे. बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (स्मॅक) अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी केले आहे. संबंधित दोन्ही प्रकल्पांमध्ये कोल्हापूरचा समावेश व्हावा, अशी आग्रही मागणी जिल्ह्यातील उद्योजकांनी संघटितपणे शुक्रवारी केली होती. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारकडे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ही बैठक होत आहे.कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आणि रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध करून देणाऱ्या मुंबई-बंगलोर कॉरिडॉरमधून कोल्हापूरला वगळले आहे. औद्योगिकदृष्ट्या विकसित असलेल्या कोल्हापूरऐवजी अविकसित असणाऱ्या आणि उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा नसलेल्या भागातून हा कॉरिडॉर नेणे अयोग्य आहे. यातून या प्रकल्पांच्या अडचणी वाढणार आहेत. कऱ्हाड-बेळगाव रेल्वेमार्गातून कोल्हापूरला बगल दिली आहे. या महत्त्वपूर्ण दोन्ही प्रकल्पांतून कोल्हापूरला वगळल्यास येथील औद्योगिक विकास ठप्प होणार आहे. कोल्हापूरवर एक प्रकारे संकट आले असून, ते परतावून लावण्यासह या प्रकल्पांमध्ये कोल्हापूरच्या समावेशासाठी हा लढा सुरू होत आहे. (प्रतिनिधी)