शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत मिशन अ‍ॅडमिशन’ आजपासून

By admin | Updated: March 18, 2017 01:10 IST

एकाच छताखाली माहिती : तीन दिवसांचे प्रदर्शन; जिल्ह्यातील नामवंत शाळांचा सहभाग

कोल्हापूर : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या पाल्याचा शाळेत प्रवेश निश्चित करण्यासाठी चांगली शाळा कोणती, शाळेची वैशिष्ट्ये काय, या गोष्टी शोधताना पालकांची चांगलीच तारांबळ उडते. त्यांची हीच धावपळ कमी करण्यासाठी पालकांना सर्व नामवंत शाळांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. आपण सारेच आतुरतेने वाट पाहत असलेल्या ‘लोकमत मिशन अ‍ॅडमिशन २०१७ व समर कॅम्प एक्स्पो’ला आज, शनिवारपासून भव्य प्रारंभ होत आहे. राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी डायस अकॅडमीच्या सीईओ दिशा पाटील, विबग्योर हायचे प्रिन्सिपॉल टी. बालन, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी प्रमुख उपस्थित असतील. सोमवार (दि. २०)पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाचे प्रायोजक डायस अकॅडमी व पॉवर्ड बाय विबग्योर हाय. तर सहप्रायोजक महावीर एज्युकेशन सोसायटी हे आहेत. प्रदर्शनामध्ये कोल्हापूर जिल्ह्णातील नर्सरीपासून दहावीपर्यंतच्या शाळाप्रवेशाची सर्वांगीण माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. परीक्षा संपल्यानंतर मार्चअखेरीस मुलांच्या प्रवेशासाठी सोयीस्कर ठरणाऱ्या शाळांची माहिती घेण्यासाठी पालकांची धावपळ सुरू होते. त्यासाठी त्यांना शाळांची शोधाशोध करावी लागते; पण, ‘लोकमत मिशन अ‍ॅडमिशन २०१७ व समर कॅम्प एक्स्पो’ या प्रदर्शनामुळे यावर्षी पालकांची धावपळ थांबणार आहे. शिवाय त्यांच्या वेळेची आणि पैशांची बचत होणार आहे.नामवंत शाळांची माहिती, त्यांचा फीचा पॅटर्न कसा आहे, मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ती शाळा नेमके काय प्रयत्न करते, यापासून शाळेतील भौतिक सोयी-सुविधांची माहितीही तुम्हाला मिळू शकेलच; शिवाय त्या शाळेच्या प्रतिनिधींशी तुम्हाला समोरासमोर बसून शाळेबाबत सविस्तर माहिती व चर्चाही करता येणार आहे.यासह आपल्या पाल्यांच्या शाळेमध्ये बदल करू पाहणाऱ्या पालकांनाही अन्य शाळांबाबत माहिती घेता येणार आहे. यामुळे पाल्यासाठी उत्तम शाळेचा पर्याय निवडण्यास पालकांना नक्कीच मदत होणार आहे. (प्रतिनिधी)शाळेतील भौतिक सोयी-सुविधांची माहिती‘फी’चा पॅटर्न कळणार शाळेच्या प्रतिनिधींशी समोरासमोर चर्चाजागेवरच प्रवेश निश्चित करण्याची संधीराजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे भरविण्यात आलेले हे प्रदर्शन आज, शनिवार ते सोमवार (दि. २०) पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत खुले राहणार आहे. तरी पालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे.