शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

आज महिला उमेदवार नशीब अजमावणार

By admin | Updated: November 18, 2014 23:23 IST

वनरक्षक शारीरिक चाचणी : २४०० उमेदवारांचा सहभाग

कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील वनरक्षक पदाच्या ५८ जागांसाठी शारीरिक चाचणीला काल, सोमवारपासून प्रारंभ झाला़ सोमवारी आणि आज, मंगळवारी उमेदवारांची धावण्याची चाचणी कागल पंचतारांकित एमआयडीसी येथील रस्त्यावर घेण्यात आली़ यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्णांतील २४०० उमेदवारांनी सहभाग नोंदविला. महिला उमेदवारांची धावण्याची चाचणी उद्या, बुधवारी सकाळी साडेआठ वाजता होणार आहे़ कोल्हापूर विभागासाठी ३४७६ अर्ज आले आहेत.पुरुष उमेदवारांना तीस मिनिटांमध्ये पाच किलोमीटर अंतर, तर महिला उमेदवारांना तीन किलोमीटर अंतर धावून पूर्ण करायचे आहे. वनरक्षक पदांसाठी आॅगस्टमध्ये जाहिरात देण्यात आली होती; पण विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे शारीरिक चाचणीची पुढे ढकलण्यात आली होती. उमेदवारांची निवड शारीरिक चाचणीतील गुण आणि बारावीतील गुणांच्या टक्केवारीच्या आधारे होणार आहे. शारीरिक चाचणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील वनखात्याचे ३५० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. उमेदवारांच्या तक्रारीसाठी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या शारीरिक चाचणीत २४२ महिला उमेदवार सहभागी होणार आहेत. दरम्यान, काल घेण्यात आलेल्या चाचणीत गोंधळ उडाल्याची चर्चा होती. याबाबत कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक एम. के. राव यांच्याशी संपर्क साधला असता, असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)