शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांबाबत आज निर्णय

By admin | Updated: March 2, 2015 00:22 IST

कारवाईबाबत बैठक : हसन मुश्रीफ यांनी घेतला विश्रामगृहावर आढावा

कोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी यांना राष्ट्रवादी पक्षाने दिलेली राजीनाम्यासाठीची मुदत शनिवारी (दि. २८) संपली. माळवी यांच्यावर पक्ष कोणती कारवाई करणार याकडे नगरसेवकांचे लक्ष लागून राहिले आहे. कारवाईबाबत रविवारी रात्री आमदार हसन मुश्रीफ यांनी नगरसेवक प्रा. जयंत पाटील, राजेश लाटकर, विरोधी पक्षनेता मुरली जाधव यांच्याशी चर्चा केली. कारवाईचा निर्णय आज, सोमवारी जाहीर करणार असल्याचे मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती.लाचखोरीच्या संशयात अडकल्यानंतर महापौर तृप्ती माळवी यांच्यावर पक्षीय कारवाई अटळ असल्याची चर्चा होती. मात्र, ९ फेब्रुवारीला राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडे सहा महिन्यांसाठी महापौरपदाची खांदेपालट होणार असल्याने पक्षीय कारवाई पुढे ढकलण्यात आली. यानंतर पडद्यामागे घडलेल्या जोरदार घडामोडीनंतर महापौर माळवी यांनी राजीनामा देण्यास टाळाटाळ केली. एक महासभा व तीनवेळा विशेष सभा होऊनही महापौर राजीनामा देण्यास तयार नाहीत. महापौरांच्या राजीनाम्यामुळे हतबल झालेल्या राष्ट्रवादीने शेवटी २८ फे ब्रुवारीची डेडलाईन दिली. तरीही महापौरांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर कोणती कारवाई करायची. महापालिकेत त्यांना विरोध करण्यासाठी कोणती व्यूहरचना आखायची याबाबत मुश्रीफ यांनी शासकीय विश्रामगृहावर चर्चा केली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बैठकीचा तपशील सांगण्यास सूत्रांनी नकार दिला. आज, सोमवारी माळवी यांच्यावरील कारवाईबाबतचा निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले. ंअडवणुकीसाठी व्यूहरचनामाळवी यांची पक्षातून हकालपट्टी केली तरी त्यांच्या पदास कोणताही धोका नाही. त्यांच्यावर कारवाई करून पक्षाचे काँग्रेससोबत ताणलेले संबंध सुधारण्यास मदत होईल. माळवी यांना सभागृहात व सभागृहाबाहेर अडवणूक करण्याबाबतच्या व्यूहरचनेसह सर्व शक्यतांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.