शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’चा आज वर्धापनदिन समारंभ

By admin | Updated: March 24, 2017 23:45 IST

सांगलीत स्नेहमेळावा : दीड तपाची वाटचाल

सांगली : वाचकांनी भरभरून दिलेल्या पाठबळावर ‘लोकमत’ वृत्तपत्राने सांगलीत १७ वर्षे पूर्ण करून १८ व्या वर्षात पदार्पण केले आहे. विविध क्षेत्रांशी असलेले प्रेम वृद्धिंगत करण्यासाठी आज (शनिवार, दि. २५ मार्च) माधवनगर रस्त्यावरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे़वाचकांशी असलेले विश्वासार्हतेचे घट्ट नाते जपत ‘लोकमत’ने दीड तपाची यशस्वी वाटचाल केली आहे. वृत्तपत्र म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ. याचे भान ठेवून साहित्य, संस्कृती, कलेचे माहेरघर असलेल्या या सांगलीत ‘लोकमत’ रुजला आणि वाढला़ प्रगतीची गरुडभरारी घेत, ऋणानुबंधाच्या गाठी घट्ट करीत, समाजहितासाठी आक्रमकता आणि विधायक दृष्टिकोनाचा पाया मजबूत करीत ‘लोकमत’ची दमदार वाटचाल गेली सतरा वर्षे सुरू आहे. विविध क्षेत्रांशी असलेले हे नातेसंबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने वर्धापन दिनानिमित्त सांगलीतील माधवनगर रस्त्यावरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात सायंकाळी पाच ते आठ या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, उपायुक्त सुनील पवार, उपमहापौर विजय घाडगे, स्थायी समिती सभापती संगीता हारगे, अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या उपस्थितीत स्नेहमेळाव्याला सुरुवात होणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, वाचक, हितचिंतकांनी उपस्थित राहून स्नेह वृद्धिंगत करावा. पर्यावरण व स्वच्छतेचा मंत्र जपताना पुष्पगुच्छ, पुष्पहाररूपी शुभेच्छांना फाटा देण्याचा निर्णय ‘लोकमत’ने घेतला आहे. मेळाव्यास येणाऱ्यांनी पुष्पगुच्छ, पुष्पहार घेऊन येऊ नये, असे आवाहन ‘लोकमत’ परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)विशेषांकाचे प्रकाशन‘स्थानिक स्वराज्य’ या संकल्पनेवर झालेली जिल्ह्याची वाटचाल, त्याचे फायदे-तोटे, उणिवा आणि सकारात्मक परिणाम, इतिहास आणि भविष्यातील स्थिती अशा सर्व अंगांनी परिपूर्ण असलेला ‘स्थानिक स्वराज्य’ हा विशेषांक वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित होत आहे. संग्राह्य अशा या विशेषांकात अनेक तज्ज्ञ लेखक व मान्यवरांनी लेखन केले आहे. त्याचे प्रकाशनही स्नेहमेळाव्यावेळी होणार आहे.