शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

‘गडहिंग्लज’ला काळभैरवाचा जयघोष-यात्रेचा आज मुख्य दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:22 IST

गडहिंग्लज : सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री काळभैरवाच्या पालखीची मिरवणूक बुधवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात झाली. ...

ठळक मुद्देचांगभलं’च्या गजरात पालखी मिरवणुकीने डोंगराकडे रवाना

गडहिंग्लज : सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री काळभैरवाच्या पालखीची मिरवणूक बुधवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात झाली. ‘चांगभलं’च्या गजरात ‘श्रीं’ची पालखी रात्री डोंगरावरील मंदिरात दाखल झाली. आज, गुरुवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे.दुपारी चार वाजता शिवाजी चौकातील श्री. काळभैरी मंदिरापासून ‘काळभैरी...बाळभैरी...भैरीच्या नावानं चांगभलं’चा गजर, गुलाल-खोबऱ्याची उधळण, ढोल-ताशांच्या गजरात ‘श्रीं’च्या पालखीची सवाद्य मिरवणुकीला सुरूवात झाली. यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्याहस्ते पालखी पूजन झाले. नेहरू चौक, वीरशैवमार्गे पालखी काळभैरी वेशीत आली. प्रथेप्रमाणे त्याठिकाणी ‘श्रीं’ची आरती झाली. त्यानंतर मिरवणूक पुन्हा डोंगराकडे मार्गस्थ झाली. मिरवणुकीच्या मार्गावर हजारो भाविकांनी व तरुणांनी सासनकाठ्यांना भक्तिभावाने लहान-मोठे गोंडे बांधण्यासाठी गर्दी केली. मिरवणुकीत अनेक तरुण मंडळाचे ढोलपथक सहभागी झाले होते.मध्यरात्री ‘श्रीं’ची शासकीय पूजा झाली. त्यानंतर ‘श्रीं’च्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली. डोंगरावरील प्रवेशद्वार ते मंदिरापर्यंत भाविकांसाठी मंडप घालण्यात आला आहे. येण्या-जाण्याचा मार्ग स्वतंत्र ठेवण्यात आला असून थेट दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.