शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रयतेच्या राजाला आज मानाचा मुजरा

By admin | Updated: June 26, 2014 00:36 IST

राजर्षी शाहू जयंती : आज विविध कार्यक्रमांचे आयोजन; उपमुख्यमंत्र्यांसह सात मंत्री राहणार उपस्थित

कोल्हापूर : रयतेचा राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची १४० वी जयंती उद्या, गुरुवारी साजरी होत आहे. यानिमित्त शासकीय कार्यालयांसोबतच विविध पक्ष, संघटना, संस्थांच्यावतीने सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शासनाच्यावतीने उद्या सकाळी साडेआठ वाजता कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळ येथे शाहू महाराजांना अभिवादन करण्यात येणार आहे. शाहू स्मारक ट्रस्ट राजर्षी शाहू छत्रपती स्मारक ट्रस्टच्या वतीने सकाळी ९ वाजता दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ््यास पुष्पहार अर्पण केला जाईल. संध्याकाळी साडेपाच वाजता शाहू स्मारक भवन येथे शाहू जयंतीचा मुख्य सोहळा होणार आहे. यावेळी हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांना श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते राजर्षी शाहू पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील असतील. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग शिवाजी विद्यापीठ व श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस यांच्या विद्यमाने राजर्षी शाहू छत्रपती व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. बोर्डिंग हाऊस हॉलमध्ये सकाळी साडेनऊ वाजता ज्येष्ठ विचारवंत डॉ. आर. बी. जाधव यांचे ‘आजच्या संदर्भात शाहू छत्रपतींचे विचार’ या विषयावर व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी.बी. पाटील असतील. कनवा करवीर नगर वाचन मंदिर येथे सकाळी साडेनऊ वाजता महालक्ष्मी धर्मशाळेचे अध्यक्ष नंदकुमार मराठे यांचे व्याख्यान होणार आहे. छत्रपती शाहू महाराजांचे शैक्षणिक धोरण या विषयावर ते विवेचन करतील. सुसंस्कार शिक्षण मंडळ सुसंस्कार शिक्षण मंडळ शाखा समूह व राजर्षी शाहू महाराज वाचनालयाच्यावतीने कदमवाडी भोसलेवाडी येथील वाचनालयात सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास डॉ. राजन गवस हे प्रमुख वक्ते असतील. अध्यक्षस्थानी युवराज संभाजीराजे असतील.