शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

टोलविरोधात आज कऱ्हाडात धरणे आंदोलन

By admin | Updated: June 26, 2014 00:42 IST

तयारी पूर्ण : मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे सर्वपक्षीय कृती समितीचे आवाहन

कोल्हापूर : सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीतर्फे उद्या, गुरुवारी कऱ्हाड येथे टोल रद्दच्या मागणीसाठी एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाची तयारी पूर्ण झाली असून, सकाळी नऊ वाजता दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलक कऱ्हाडकडे रॅलीने रवाना होणार आहेत. सर्व वाहनधारकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांनी केले आहे.कोल्हापुरातील टोल प्रश्नाकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष वेधण्यासाठी कऱ्हाड येथील त्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला. सातारा पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरील रस्ता कमी रुंदीचा आहे, तसेच समोरच एक मोठे हॉस्पिटल आहे, यामुळे मार्केट यार्ड येथे आंदोलन करण्याची विनंती आंदोलकांना केली. ती विनंती मान्य करून मुख्यमंत्र्यांच्या घराऐवजी मार्के ट कमिटी येथे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या तयारीसाठी सर्व शिक्षण संस्था, वाहतूक संघटना, विविध राजकीय पक्ष यांच्याशी कृती समितीच्या सदस्यांनी प्रत्यक्ष संपर्क साधलेला आहे. वाहनांसह कार्यकर्त्यांनी सकाळी ९ वाजता दसरा चौक येथे जमण्याचे ठरले आहे. कराडपर्यंत जाणारी ही रॅली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात येईल. या आंदोलनादरम्यान कोणावरही वैयक्तिक किंवा पक्षीय टीका केली जाणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. कोल्हापूरच्या परंपरेला शोभेल अशी ही रॅली अन् आंदोलन करूया, असे आवाहन साळोखे यांनी केले आहे. आंदोलनात कोल्हापूर बार असोसिएशन, लॉरी असोसिएशन टेम्पो व आॅटो रिक्षा युनियन, खासगी बस असोसिएशन आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)