शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘चक्का जाम’ आंदोलन आजपासून

By admin | Updated: October 1, 2015 00:58 IST

१६ हजार मालवाहतूकदारांचा सहभाग : टोल, टीडीएस रद्दची मागणी

कोल्हापूर : देशांतर्गत राष्ट्रीय महामार्गांवर असणारे ३७२ टोलनाके बंद करून वार्षिक टोल परमिट द्यावे, टीडीएस रद्द यांसह अन्य मागण्यांसाठी आज, गुरुवारपासून देशातील मालवाहतूकदार बेमुदत ‘चक्का जाम’ आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात कोल्हापुरातील १६ हजार मालवाहतूकदारही सहभागी होणार असल्याची माहिती कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी दिली. केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या टोल आणि वाहनधारकांकडून बिल देण्यापूर्वी वसूल केला जाणारा टी.डी.एस. रद्द करावा, या मागणीसह राज्य शासनाच्या अखत्यारीत असणारा पर्यावरण कर, व्यवसाय कर रद्द करावा व जुन्या वाहनांना स्पीड गव्हर्नरची सक्ती करू नये, आदी मागण्यांबाबत हा ‘चक्का जाम’ आजपासून बेमुदत केला जाणार आहे. याबाबत वाहतूक व्यावसायिकसुद्धा राजी झाले असून, त्यांनी २७ सप्टेंबरपासूनच मालाची नोंदणी बंद केली आहे. मुळात वाहतूकदारांचा टोलला विरोध नाही. टोलवसुली ही वार्षिक टोल परमिटच्या रूपाने एकरकमी घ्यावी. टोलच्या रूपाने १४ हजार कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत जात आहेत. त्यात एकरकमी घेतल्याने आणखी वाढ होईल. यामुळे चारचाकी खासगी वाहनधारकांवर टोलवसुलीचा कोणताही बोजा पडणार नाही. याबाबत वेळोवेळी आॅल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन, निवेदन दिले आहे. मात्र, सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आजपासून बेमुदत चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. यावेळी उपाध्यक्ष भाऊ घोगळे, सचिव हेमंत डिसले, प्रकाश केसरकर, विजय भोसले, शिवाजी चौगले, बाबल फर्नांडिस, विलास पाटील, पंडित कोरगांवकर, जगदीश सोमय्या, प्रकाश भोसले, विजय पोवार, विक्रम पाटील, उमेश महाडिक, वामन चौगले, आदी उपस्थित होते. आंदोलनास चेंबर्स आॅफ कॉमर्सचा पाठिंबाया ‘चक्का जाम’मध्ये जिल्ह्यातील १६ हजार मालवाहतूकदार, ९०० टँकर, ११ हजार टेम्पोधारक आणि जिल्हा वाळू वाहतूकदार, बॉक्साईट वाहतूकदार संघटना सहभागी होणार आहेत. या आंदोलनास कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्ट्रीजने पाठिंबा दर्शविला आहे.