शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

विकास संस्थांचा व्यवसायाभिमुखतेकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 01:13 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अटल महापणन विकास अभियानांतर्गत जिल्ह्णातील १३६ विकास संस्था व सात खरेदी-विक्री ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अटल महापणन विकास अभियानांतर्गत जिल्ह्णातील १३६ विकास संस्था व सात खरेदी-विक्री संघ व्यवसायाभिमुख झाले असून, त्यांनी सुरू केलेल्या विविध उद्योगांत तब्बल १४.६८ कोटींची गुंतवणूक केली आहे. या संस्थांची उलाढालही वाढली असून, त्यामुळे उत्पन्नातही मोठी भर पडली आहे. छोट्या-मोठ्या उद्योगांमुळे रोजगार उपलब्ध झालेच; पण संस्थाही सक्षम होण्यास मदत झाली.डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत अटल महापणन विकास अभियान सुरू केले. सहकार विभागाने आवाहन केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी तालुका निबंधकांच्या माध्यमातून विकास संस्था व खरेदी-विक्री संघांना प्रोत्साहित केले. त्यातून डिसेंबर २०१७ अखेर ८० विकास संस्था, तर सात खरेदी-विक्री संघांनी सहभाग घेतला. त्यांनी मूळ कामाबरोबरच छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले. संस्थांना व्यवसायाची गोडी लागल्याने गेल्या वर्षभरात त्यात वाढ होऊन डिसेंबर २०१८ अखेर १३६ संस्थांनी या अभियानात सहभाग घेतला. या संस्थांनी १३५ रोजगार सुरू केले आहेत.या संस्था ठरल्या मॉडेलश्रीराम विकास संस्था, कसबा बावडाने सांस्कृतिक भवन उभे केले. त्यातून वार्षिक १६.०९ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. शेडशाळ ग्रामविकास संस्थेने कन्ट्युल रिन्युएबल प्रा. लि., पुणे या कंपनीशी करार करून सौरऊर्जा निर्मितीचा प्रकल्प पूर्ण केला. प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ‘महावितरण’ला दिली आहे. छत्रपती विकास, उचगाव संस्थेने ‘छत्रपती शुद्ध पेयजल’ एटीएम सुरू केले. त्यातून वार्षिक ३.६० लाखांचे उत्पन्न होते. चंदगड तालुका खरेदी-विक्री संघाने कार्यक्षेत्रातील लोकांना रास्त दरात जीवनाश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी ‘तुलसी बझार’ सुरू केला.अटल महापणन विकास अभियानाचे यशविकास संस्था व्यवसायातील गुंतवणूक मिळालेले उत्पन्न निव्वळ नफा प्रकल्प सुरू प्रगतिपथावर१३६ ११.४६ कोटी ५३.५६ लाख ३९.५० लाख १३६ १००७ (खरेदी-विक्री संघ) ३.२२ कोटी ५२.७१ लाख १८.५० लाख ३ ४१४३ १४.६८ कोटी १.०६ कोटी ५८ लाख १३९ १०४