शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर ‘लोकमत’चा आज वर्धापनदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:26 IST

कोल्हापूर : निर्भीड, निष्पक्ष आणि विधायक पत्रकारितेतील मानदंड असलेल्या ‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीचा चौदावा वर्धापनदिन आज, सोमवारी मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. यानिमित्त ‘लोकमत’ परिवाराच्यावतीने महासैनिक दरबार हॉलमध्ये सायंकाळी पाच ते रात्री साडेआठ या वेळेत स्नेहमेळावा आयोजित केला आहे.या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन सायंकाळी पाच वाजता महापौर शोभा बोंद्रे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका ...

कोल्हापूर : निर्भीड, निष्पक्ष आणि विधायक पत्रकारितेतील मानदंड असलेल्या ‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीचा चौदावा वर्धापनदिन आज, सोमवारी मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. यानिमित्त ‘लोकमत’ परिवाराच्यावतीने महासैनिक दरबार हॉलमध्ये सायंकाळी पाच ते रात्री साडेआठ या वेळेत स्नेहमेळावा आयोजित केला आहे.या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन सायंकाळी पाच वाजता महापौर शोभा बोंद्रे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते होणार आहे. ऐतिहासिक तसेच धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या रांगड्या कोल्हापुरात ‘लोकमत’ने चौदा वर्षांपूर्वी पाऊल ठेवले, तेव्हापासून आजतागायत घडलेल्या स्थित्यंतरांचा साक्षीदार म्हणून ‘लोकमत’ने आपल्या लेखणीची मशाल तेवत ठेवली. वृत्तपत्र म्हणून समाजात घडणाऱ्या बºया-वाईट घटना जनतेपर्यंत पोहोचवितानाच ‘लोकमत’ने समाजाप्रती असलेली बांधीलकी जपत विधायक पत्रकारितेला आणि सामाजिक उपक्रमांना नेहमीच प्राधान्य दिले आहे; त्यामुळेच ‘लोकमत’ने घराघरांत आणि मनामनांत विश्वासाचे व आपुलकीचे नाते निर्माण केले. ‘लोकमत’ने बाल विकास मंच, युवा नेक्स्ट आणि सखी मंच यांच्या माध्यमातून समाजाचा मुख्य घटक असलेल्या या नव्या पिढीला स्वतंत्र व्यासपीठ दिले. जबाबदार नागरिक म्हणून व्यक्तीचा सर्वांगीण विकास आणि वैचारिक परिपक्वता येण्यासाठीचे माध्यम म्हणून ‘लोकमत’ परिवार काम करीत आहे. अल्पावधीतच कोल्हापूरकरांशी नाळ जुळलेला ‘लोकमत’ म्हणजे एक मोठा परिवारच. या परिवाराला आपल्याकडून मिळणाºया शुभेच्छा यापुढेही निर्भीडपणे काम करण्याची ऊर्मी देतात. पाठीवर कौतुकाची थाप मिळाली की, लेखणीची धारही अधिक तळपते, म्हणूनच तुमच्या-आमच्या आणि कोल्हापूरकरांच्या ‘लोकमत’च्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यास समस्त कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आग्रहाचे आवाहन ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी केले आहे.दरम्यान, यावर्षी वर्धापनदिनानिमित्त ‘लोकमत’तर्फे ‘आरोग्य संपदा’ हा विशेषांक प्रसिद्ध झाला आहे. हा विशेषांक रविवारपासून वाचकांच्या भेटीला आला आहे. त्यामध्ये कोल्हापूरचे आरोग्यविश्व, सुविधा आदींचा वेध घेण्यात आला आहे. या विशेषांकाचे वाचकांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत होत आहे.स्नेहमेळाव्याची वेळवेळ : सायंकाळीपाच ते रात्री साडेआठस्थळ : महासैनिक दरबार हॉल