शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

शिष्यवृत्तीधारकांसाठी तायशेटेंनी दिले मानधन

By admin | Updated: November 18, 2014 23:21 IST

मार्गदर्शक शिक्षकांना कौतुकाबरोबरच स्फूर्ती मिळावी, त्यांचा यथोचित सन्मान व्हावा,

आमजाई व्हरवडे : शिष्यवृत्ती परीक्षेच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राहावी, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना कौतुकाबरोबरच स्फूर्ती मिळावी, त्यांचा यथोचित सन्मान व्हावा, म्हणून तालुक्यातील अशा यशवंतांच्या गुणगौरव सोहळ्यासाठी आपले मानधन देण्याचा प्रेरणादायी निर्णय जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती अभिजित तायशेटे यांनी जाहीर केला.राधानगरी येथे झालेल्या मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती रूपालीताई पाटील होत्या. या त्यांच्या सामाजिक बांधीलकीचे शैक्षणिक वर्तुळातून स्वागत व कौतुक होत आहे. गेल्या १५ वर्षांपासून शिष्यवृत्तीची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या राधानगरी तालुक्याने अनेकदा राज्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे, तर हजारो विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले आहेत. मात्र, दोन वर्षांपासून ही परंपरा खंडित झाली आहे. दरवर्षी शिक्षक पतसंस्था व अन्य सेवाभावी संस्थांच्यावतीने या गुणवंतांचे सत्कार होतात. शिक्षकांची अपेक्षा असतानाही पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाला असे कार्यक्रम घेताना आर्थिक मर्यादा येत आहेत, असे निदर्शनास आल्याने तायशटे यांनी सभापतिपदाच्या कार्यकालात या गुणगौरव समारंभाचा खर्च स्वत:च्या मानधनातून करण्याचा निर्णय घेतला आहे. खंडित झालेली ही परंपरा पुन्हा सुरू व्हावी, गुणवंतांना प्रेरणा मिळावी, हाच आपला हेतू यामागे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपसभापती सुप्रिया साळोखे, अजित पोवार, गटविकास अधिकारी ए. डी. नाईक, गटशिक्षणाधिकारी माधवमांडे, जिल्हा परिषदेच्या सदस्या दीपा पाटील, मंगल कलिकते, जयसिंग खामकर, प्रल्हाद पाटील, आदी उपस्थित होते. डी. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. (वार्ताहर)