शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या तोतया पोलीस अधिकाऱ्याकडून गंडा

By admin | Updated: March 9, 2016 01:30 IST

लाखो रुपयांची फसवणूक: दोघांना आमिष दाखविणारा भामटा कोल्हापूर पोलिसांकडे

एकनाथ पाटील--कोल्हापूर -रंगाने गोरा, उंची साडेसहा फूट, धष्टपुष्ट शरीरयष्टी, डोळ्यावर रेबॅन गॉगल, अंगामध्ये किमती कपडे, हातामध्ये अडीच लाख किमतीचे रॅडो कंपनीचे घड्याळ, दिमतीला आलिशान गाडी अशा रूबाबात मुंबई पोलीस दलात पोलीस निरीक्षक असल्याचे खोटे सांगून कोल्हापुरातील दोघा तरुणांना नोकरीचे आमिष दाखवत लाखो रुपयांना गंडा घातला.संशयित आरोपी निलंबित पोलीस कॉन्स्टेबल असून राजकुमार ज्ञानदेव पाटील (वय ४२, रा. ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई) त्याचे नाव आहे. भामटा राजकुमार याचे मूळ गाव वडूज (जि. सातारा)आहे. तो सन १९९८ मध्ये मुंबई पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई पदावर भरती झाला. सेवेत असताना त्याने चंद्रपूरला नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणाची फसवणूक केल्याने तो निलंबित झाला. त्याने १६ वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर बनवेगिरी करण्यास सुरुवात केली. नागरिकांना मुंबई पोलीस दलात पोलीस निरीक्षक असल्याची सांगून भुरळ पाडत होता. त्याने काहीजणांना राजकुमार डी. पाटील (पोलीस निरीक्षक) या नावाचे व्हिजिटिंग कार्ड देखील दिले आहे. पंढरपूर (जि. सोलापूर) येथेही एकाला लाखो रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी त्याच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यानंतर तो फरार झाला. त्यानंतर त्याने मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आदी जिल्ह्यांत फिरताना आलिशान हॉटेलमध्ये राहत असे. जेवण करून बाहेर पडताना पोलीस निरीक्षकाचे कार्ड दाखवून बिल न देताच निघून जात असे. महागड्या वस्तूच्या बदल्यात दुकानदाराला धनादेश देत तो सरकारी खात्यावरील असल्याचे सांगत असे. नोव्हेंबर २०१५ मध्ये त्याने दुकानातून रॅडो कंपनीचे २ लाख ५० हजार किमतीचे घड्याळ नेले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याची छबी कैद झाल्यानंतर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तो मित्रांना भेटायला आल्याचे समजताच लष्कर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून दोन व्हिजीटिंग कार्ड, दोन मोबाईल, बँकेचे कार्ड आणि त्याने २७ हजार ५०० रुपये किमतीचे घड्याळ हस्तगत केले.