शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

टायर फुटून दुचाकी दुभाजकाला धडकली; तरुण उद्योजक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 01:13 IST

कसबा बावडा : भरधाव मोटारसायकलचा टायर फुटून गाडी दुभाजकावर आदळल्यामुळे बावड्यातील तरुण उद्योजकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी ...

कसबा बावडा : भरधाव मोटारसायकलचा टायर फुटून गाडी दुभाजकावर आदळल्यामुळे बावड्यातील तरुण उद्योजकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शिये टोलनाका ते तस्ते ओढ्यादरम्यान घडली. राहुल कृष्णा चौगले (वय ३०, रा. प्रिन्स शिवाजी शाळेजवळ, कसबा बावडा) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत समजलेली माहिती अशी, राहुल चौगले याचे औद्योगिक वसाहतीत छोटेसे वर्कशॉप आहे. नेहमीप्रमाणे तो आपल्या वर्कशॉपकडे जात होता. शिये टोलनाक्याच्या पुढे काही अंतर गेल्यानंतर त्याच्या मोटारसायकलचा टायर फुटला व मोटारसायकल रस्त्याच्या दुभाजकावर धडकली.ही धडक इतकी जोरात होती की, गाडी काही अंतर पुढे जाऊन त्याच्या डोक्यास जबरदस्त मार बसला. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी यावेळी रुग्णवाहिकेस फोन करून तातडीने त्याला सीपीआरमध्ये हलविले.राहुल विवाहित होता. त्याला एक लहान मुलगा आहे. त्याच्या कुटुंबीयांचा शेती व्यवसाय आहे. चार वर्षांपूर्वी त्याने शिरोली एमआयडीसी येथे छोटासा कारखाना उभारला होता. अपघात होताच त्याच्या मित्रांनी व नातेवाइकांनी त्याच्या घरी व सीपीआरमध्ये गर्दी केली होती. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.