शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

हवा भरताना टायर फुटून तरुणाचा मृत्यू

By admin | Updated: January 3, 2015 00:53 IST

सुमारे २५ फूट उंच उडून तो खाली आदळला. तर सुमारे १५० फुटांवर मेंदू व व्हीलचा एक भाग उडून पडलेला होता

तुरंबे : कोल्हापूर-गारगोटी राज्य मार्गावर चंद्रे (ता. राधानगरी) येथे पंक्चर काढत असताना हवा भरत असताना टायर फुटून पांडुरंग शंकर कुंभार (वय ३५) हा तरुण जागीच ठार झाला. सुमारे २५ फूट उंच उडून तो खाली आदळला. तर सुमारे १५० फुटांवर मेंदू व व्हीलचा एक भाग उडून पडलेला होता. कुंभार कुटुंबामधील कर्त्या पुरुषावरच अचानक काळाने झडप घातल्याने हे कुटुंब उघड्यावर पडले आहे. घटनेची राधानगरी पोलिसांत नोंद आहे. चंद्रे फाट्यावर पांडुरंग कुंभार यांचा पंक्चर काढण्याचा व्यवसाय आहे. आज, शुक्रवार सायंकाळी ते ट्रॅक्टरच्या पुढील चाकाचे पंक्चर काढत होते. हवा भरताना इनरमध्ये हवेचा दाब वाढल्याने लोखंडी व्हील तुटले. टायरवर बसलेले कुंभार सुमारे २५ फूट उंचावर टायरसह उडाले व लोखंडी कमानीला डोके आदळले. यामध्ये ते जागीच ठार झाले. कवटी फुटल्याने सुमारे १५० फूट मेंदू आणि व्हीलचा एक भाग उडून पडला होता. घटनास्थळावरील दृश्य पाहून अनेकांना धक्काच बसला. मनमिळावू स्वभावाचा पांडुरंग याने २०१२ पासून हा व्यवसाय सुरू केला होता. घटनास्थळी पंक्चर काढण्याचे सर्व साहित्य विखुरले होते. गेल्या काही दिवसांपासून येथे विद्युतपुरवठा कमी अधिक दाबाने मिळत असे. या दरम्यान हवा भरण्याचे मशीन अचूक हवेचा दाब दाखवत नव्हते. यामुळेच ही घटना घडली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच लोकांनी मोठी गर्दी केली होती. पांडुरंग यांच्या पश्चात पत्नी, तीन व पाच वर्षांची दोन मुले आहेत. वडिलांचा सायकल पंक्चर काढण्याचा व्यवसाय गावात आहे.