शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
3
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
4
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
5
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
6
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
7
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
8
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
9
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
10
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
11
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
12
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या
13
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
14
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
15
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
16
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
17
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
18
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
19
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
20
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

‘कायदे पाळा असे सांगण्याची वेळ’... ७५ जणांची नेमणूक; पण...

By admin | Updated: September 10, 2014 00:27 IST

सतेज पाटील : इचलकरंजीत नवीन शहापूर पोलीस ठाण्याचे उद्घाटन

कासा: डहाणू तालुक्यातील कासा जवळील शेकडो गावातील शेतीला पाणीपुरवठा करणारे सूर्या धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाचे पाचही दरवाजे उघडल्याने कासा परिसरातील गावात पुरस्थिती निर्माण झाली आहे. धरणातून ८००० क्युसेक पाणी सोडले आहे.पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू व विक्रमगड तालुक्यातील शेकडो गावांना उन्हाळ्यात सूर्या धरणातून कालव्याअंतर्गत भातशेतीला पाणीपुरवठा केला जातो. सदर धरणाअंतर्गत सुमारे १४.६९६ हेक्टर जमीन ओलिताखाली आणली आहे. सूर्या धरण गेल्या आठवडाभरापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे तसेच दोन दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे भरले आहे. सदर धरणातील पाणी पातळी क्षमता ११८.६० मी. आहे. मात्र अतिवृष्टीमुळे पाण्याची पातळी सुमारे ११९.४० एवढी झाली आहे. त्यामुळे पाण्याची पातळी आटोक्यात आणण्यासाठी धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने धरणाच्या वरील गावपाड्यांनाही पूराचा धोका निर्माण झाला आहे.सूर्या धरणातून सोमवारी संध्याकाळी ४ वाजेपासून पाणी सोडल्याने सूर्या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. त्यामुळे नाले, ओहोळ यांनाही पूर आला आहे. त्यामुळे कासा परिसरातील गावपाड्यावरचा संपर्क तुटला होता. तर पूल, रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद पडली होती. सूर्या नदीवरील पेठ-म्हसाड जवळील पूल दोन दिवसापासून पाण्याखाली गेला आहे. तसेच नदीकाठील भातशेतीही काही ठिकाणी पाण्याखाली गेली आहे. (वार्ताहर)