शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीसाठी आताच योग्य वेळ

By admin | Updated: June 12, 2016 01:38 IST

समिती शुक्रवारपासून कोल्हापुरात : जिल्हा परिषद निवडणुकीनंतर अडचणींत वाढ

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीचा आढावा घेण्यासाठी नगरविकास विभागाने नियुक्त केलेली समिती येत्या शुक्रवारी (दि. १७) कोल्हापुरात येत असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. समितीचा दौरा निश्चित झाल्यामुळे हद्दवाढ होण्याची शक्यता तयार झाली आहे. या समितीने निर्णय काहीही दिला तरी दोन्ही औद्योगिक वसाहती वगळून व शहरालगतची गावे समाविष्ट करून हद्दवाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पालकमंत्री स्वत:च त्याबाबत फार आग्रही आहेत. आताच आॅक्टोबरपूर्वी त्याबाबत काही ठोस निर्णय होण्याची गरज आहे. अन्यथा, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली तर पालकमंत्र्यांना राजकीयदृष्ट्याही याबाबत काही निर्णय घेणे शक्य होणार नाही. एकदा जिल्हा परिषद निवडणूक झाल्यावर मग मात्र हद्दवाढ करणे राजकीय व कायदेशीरदृष्ट्या फारच अडचणीचे होईल. जिल्हा परिषदेच्या सभागृहाचीही आता मुदत संपत असल्यामुळे फारसा विरोध होणार नाही. नवे सभागृह आल्यावर हद्दवाढ करण्यास तीव्र विरोध होईल; कारण त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहाची पुनर्रचना होऊ शकते. त्याला निवडणुकीनंतर सहजासहजी कोण तयार होणार नाही. पालकमंत्री पाटील यांनी स्वत: लक्ष घालून याबाबत नागरिकांची आग्रही मागणी विचारात घेऊन तत्काळ ठोस निर्णय होण्याच्या दृष्टीने नगरविकास विभागातील दोन तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विनंती केली होती. ही समिती १७ व १८ रोजी कोल्हापूरला येऊन जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांची भेट घेऊन हद्दवाढीबाबत चर्चा करून आपला अहवाल शासनास सादर करणार असल्याचे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)