शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘बाहुबली’ गुरुकुलात स्रेहभोजनाने माजी विद्यार्थ्यांचा ‘थर्टी फर्स्ट’ - गुड न्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:02 IST

बाहुबली : येथील बाहुबली ब्रह्मचार्र्याश्रम गुरुकुलमध्ये १९९४ साली दहावीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी रविवारी (दि. ३१ डिसेंबर) तेथील विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचे

भरत शास्त्री ।बाहुबली : येथील बाहुबली ब्रह्मचार्र्याश्रम गुरुकुलमध्ये १९९४ साली दहावीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी रविवारी (दि. ३१ डिसेंबर) तेथील विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचे आयोजन करून वर्षाखेर व नववर्षाचे स्वागत करून आपले स्नेहसंमेलन पार पाडले. हे सर्व विद्यार्थी आपल्या कुटुंबीयांसोबत आले होते.

१९९४ च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी कोणतीही पाश्चिमात्य संस्कृती किंवा धांगडधिंगा यांना फाटा देत सेलिब्रेशन न करता आपण विधायक पद्धतीने थर्टी फर्स्ट साजरा करण्याचे ठरविले. आपण ज्या गुरुकुलमध्ये संस्कार घेतले तेथील विद्यार्थी मित्रांशी संवाद साधला.

या बॅचमधील विविध विद्यार्थी पुढे राजकीय, सामाजिक, पत्रकारिता, व्यवसाय यामध्ये चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. ब्रह्मचारी श्रीधर अण्णा यांनी १९९४ बॅचमधील विद्यार्थ्यांसोबत हितगुज केले. अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी प्रत्येक व्यक्ती व कुटुंबीयांची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी करून गुरुकुलने दिलेले धार्मिक संस्कार पुढेही न विसरण्याचे आवाहन केले. सत्य, अहिंसा, त्याग, अपरिग्रह आणि नैतिकता आपल्या आचरणामध्ये जोपासण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

कार्यक्रमाचे नियोजन युवराज पाटील, योगेश पायशेट्टी, प्रवीण पाचोरे, उमेश मसरगुप्पी, विजयकुमार चौगुले, प्रशांत कोईक, जिनगोंडा पाटील, बाबासाहेब पाटील, जयकुमार चौगुले, सुदर्शन चौगुले, प्रवीण किणे, शीतल पाटील, शीतल बुरसे, आदींनी केले होते.

गुरुकुलमधील विद्यार्थी म्हणजे अस्सल सोनंबाहुबली गुरुकुलच्या मुशीतून धार्मिक संस्कार घेऊ न घडलेले विद्यार्थी जीवनात कधीही तत्त्वांपासून परावृत्त होत नाहीत, ते अस्सल सोनंच आहे. शतकोत्तर वाटचाल करणाºया या गुरुकुलातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊ न गेले आहेत. ते विविध क्षेत्रात सचोटीने आणि न्यायाने कार्यरत आहेत. त्यांचे यश पाहून माझे हृदय प्रफुल्लित होते. आपल्या मातृसंस्थेचे ऋण फेडण्यासाठी आपण नेहमीच असे उपक्रम केले पाहिजेत. - बह्मचारी श्रीधर अण्णा