कोल्हापूर : काही वर्षे शांत असलेला जवाहरनगरातील गुन्हेगारांच्या टोळीतील वाद पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. काहींनी तीन दुचाकीवरून गँगस्टरच्या मोटारीचा थरारक पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पाठलाग करतानाच मोटारीवर एडका हे हत्यार फेकून मारल्याने गोंधळ उडाला. बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता गजबजलेल्या पापाची तिकटी परिसरात घटना घडल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस पापाची तिकटी व जवाहरनगरकडे धावले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जवाहरनगर परिसरात रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
जवाहरनगर परिसरात आर.सी. गँग व भास्कर गँग या दोन टोळ्यांतील संघर्ष सर्व कोल्हापूर जिल्ह्याला परिचित आहे. गेले काही वर्षे पोलिसांच्या कडक भूमिकेमुळे दोन्हीही टोळ्या शांत होत्या; पण बुधवारी सकाळी एक गँगस्टर मोटारकारमधून महाद्वार रोडवरून पापाची तिकटी परिसरात आला असता, तीन-चार जणांनी त्याच्या मोटारीवर हल्ल्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी मोटारीवर एडका हे हत्यार फेकून मारले. ते मोटारीवरून रस्त्यावर आपटल्याने त्याचा मोठा आवाज झाला. हल्ल्याची जाणीव होताच संबंधित गँगस्टरने मोटारकार गंगावेशच्या दिशेने पळविली. हल्लेखोरांनी त्या मोटारीचा थरारक पाठलाग केला. यामुळे पापाची तिकटी परिसरात गोंधळ उडाला. माहिती मिळताच जुना राजवाडा पोलीस तातडीने पापाची तिकटी परिसरात आले.
वादाच्या पार्श्वभूमीवर जवाहरनगर परिसरात तरुणांचे टोळके एकत्र जमू लागले. याची माहिती मिळताच राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक इश्वर ओमासे व पोलिसांनी जवाहरनगर भागात धाव घेतली. तोपर्यंत तरुणांचे टोळके पसार झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जवाहरनगर परिसरात रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
फोटो नं. २२०९२०२१-कोल-क्राईम०१,०२
ओळ : पापाची तिकटी परिसरात बुधवारी सायंकाळी गँगस्टरच्या मोटारीचा थरारक पाठलाग करून त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने जवाहरनगर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
220921\22kol_7_22092021_5.jpg~220921\22kol_8_22092021_5.jpg
ओळ : पापाची तिकटी परिसरात बुधवारी सायंकाळी गॅगस्टरच्या मोटारीचा थरारक पाठलाग करुन त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने जवाहरनगर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. ~ओळ : पापाची तिकटी परिसरात बुधवारी सायंकाळी गॅगस्टरच्या मोटारीचा थरारक पाठलाग करुन त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने जवाहरनगर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.