कोल्हापूर : चौंडाळ (ता. कागल) येथे पूर्ववैमनस्यातून महिलेस जातिवाचक शिवीगाळ व विवस्त्र करून मारहाण केल्या प्रकरणात दोषी ठरल्याने तीन संशयित महिलांना सहा महिने सक्तमजुरी व प्रत्येकी २०० रुपये दंड, अशी शिक्षा गुरुवारी चौथे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. पाटील यांनी सुनावली. संशयित आरोपी सुमन मारुती रेपे (वय ४१), साताबाई नारायण पाटील (४६) व संजीवनी सदाशिव रेपे (४१) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, संशयित आरोपींनी आपल्या वकिलांच्या वतीने जामीन मंजुरीसाठी अर्ज दाखल केला. त्यावर सुनावणी होऊन न्यायाधीशांनी त्यांची अपील दाखल करेपर्यंत एक महिन्यासाठी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली. याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी नीलाबाई नाना कांबळे (६५) या व संशयित आरोपी एकाच गावचे रहिवाशी आहेत. दि. ३० आॅक्टोबर २०१३ रोजी सकाळी आठच्या सुमारास कांबळे या आपल्या घरात लाकडी बेडवर बसल्या होत्या. यावेळी संशयित आरोपी पूर्ववैमनस्यातून त्यांच्या घरात घुसल्या. यावेळी सुमन रेपे हिने त्यांना जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण करीत रस्त्यावर ओढत आणले. करवीरचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक विठ्ठल पवार यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. तेरा साक्षीदारांची तपासणीप्रकरणाची सुनावणी गुरुवारी चौथे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. पाटील यांच्यासमोर झाली. यावेळी सरकारी वकील अश्विनी निपाणे यांनी फिर्यादीसह एकूण १३ साक्षीदार तपासले. फिर्यादीचा जबाब, प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा जबाब, डॉक्टर व पोलिसांचा जबाब, पुरावे आणि वकील निपाणे यांचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायाधीश पाटील यांनी आरोपींना दोषी ठरविले.
तीन महिलांना सक्तमजुरी
By admin | Updated: June 12, 2015 00:42 IST