शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार वाहक-चालकांचा रोज लाखो प्रवाशांशी संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:44 IST

कोल्हापूर : लाॅकडाऊनपूर्वीप्रमाणेच एसटीची लालपरी पुन्हा रुळावर येऊ लागली असून, रोज तीन हजार चालक-वाहक रात्रंदिवस प्रवाशांच्या सेवेत कार्यरत आहेत. ...

कोल्हापूर : लाॅकडाऊनपूर्वीप्रमाणेच एसटीची लालपरी पुन्हा रुळावर येऊ लागली असून, रोज तीन हजार चालक-वाहक रात्रंदिवस प्रवाशांच्या सेवेत कार्यरत आहेत. यात सुमारे पावणेदोन लाख प्रवाशांशी या कर्मचाऱ्यांचा संपर्क येऊ लागला आहे. कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे वाहक-चालकांसह प्रवाशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे. सद्य:स्थितीत कोल्हापूर आगाराच्या ७०० बस राज्यातील कानाकोपऱ्यापर्यंत धावत आहे.

लाॅकडाऊनच्या काळात ६० ते ७० दिवस एसटीची सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने एक सीट सोडून प्रवाशांना तालुकांतर्गत प्रवासाला मुभा दिली. सर्व प्रवाशांची थर्मल टेस्ट केल्यानंतर त्यांना बसमध्ये प्रवेश दिला जात होता. त्यानंतर आता पूर्ण क्षमतेने ही सेवा सुरू आहे. यात राज्याच्या कानाकोपऱ्याबरोबरच गोवा, उत्तर कर्नाटक, आंध्र आदी ठिकाणी ही सेवा सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, चंदगड, आजरा, इचलकरंजी, जयसिंगपूर, हातकणंगले, शिरोळ, गारगोटी, मुरगूड, राधानगरी आदी ठिकाणी प्रवासी वाहतुकीला उत्तम प्रतिसाद आहे. केवळ गगनबावडा मार्गावरील वाहतुकीला प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद आहे. सर्वच आगारांतून सातशे बस रात्रं-दिवस असून, त्यांच्याकडून किमान दोन ते अडीच लाख किलोमीटरचे अंतर पार केले जाते. एकूणच सर्व परिस्थिती पूर्ववत होत असताना आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केल्यामुळे त्याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर झाल्यास एसटी महामंडळाचे कंबरडे मोडण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीती आहे.

विनामास्क प्रवास

अनेक प्रवासी विनामास्क बसमधून प्रवास करतात. त्यांना वाहकाने हटकले की, त्यांच्याबरोबर वादावादी करणे, असे प्रकार वारंवार होतात. यापूर्वी महामंडळाकडून प्रवाशांची थर्मल चाचणी केली जात होती. मात्र, ती मागे पडली. आता सर्वच आलबेल असल्यासारखे सर्व प्रवासी वावरत आहेत.

लसीकरण अद्यापही नाही

सद्य:स्थितीत कोल्हापूर विभागात चालक (१५००), वाहक (१५००), असे तीन हजार कर्मचारी एसटी बसमधून लाखो प्रवाशांसोबत दिवस-रात्र असतात. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात या विभागात आहे. त्यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांना प्राधान्याने कोविशिल्ड लस देणे गरजेची बाब आहे, असे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

बस -७००

फेऱ्या - ४५००

कि.मी. अंतर - २ ते २.५० लाख अंतर रोज

प्रवासी संख्या : १ लाख ७५ हजार ते दोन लाख इतकी

कोट

कर्मचाऱ्यांना लसीकरणाबाबत वरिष्ठ अथवा जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही सूचना अथवा आदेश आलेला नाही. तो आल्यास त्वरित अंमलबजावणी करू. सद्य:स्थितीत आमचे सर्व कर्मचारी योग्य ती काळजी घेऊनच काम करीत आहेत.

- रोहन पलंगे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, कोल्हापूर विभाग.