कोल्हापूर : काल, गुरुवारपासून सुरू झालेल्या खेळाडू व फुटबॉल संघ नोंदणी प्रक्रियेत आज, शुक्रवारी बालगोपाल तालीम मंडळ, उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ आणि कोल्हापूर पोलीस संघ या तीन संघांनी यंदाच्या फुटबॉल हंगामासाठी कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनकडे रीतसर नोंदणी केली. या संघासोबतच इतर संघांतील ४५ खेळाडूंचीही नोंदणी केली. दुसऱ्या दिवसाअखेर एकूण १०२ खेळाडूंची नोंदणी झाली आहे.यंदाच्या हंगामात एकूण सोळा संघांपैकी बालगोपाल तालीम मंडळाने परदेशी खेळाडू न खेळविण्याच्या निर्णयाविरोधात कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनकडे तक्रार केली होती. यामुळे यंदाचा हंगाम वेळेवर सुरू होते की नाही, अशी शंका निर्माण झाली होती. परंतु, बालगोपाल तालीम मंडळाने आज गोव्यातील वेजीस, महादेव तलवार आणि बेळगावच्या अभय संभाजीचे या खेळाडूंची बाहेरील खेळाडू म्हणून नोंदणी केली. त्यामुळे यंदा फुटबॉल हंगाम १५ ते २२ नोव्हेंबर या नेहमीच्याच कालावधीत सुरू होण्याची चिन्हे आहेत. रंकाळा तालीम मंडळाकडून खेळणारा आशिष गवळी व साईनाथ स्पोर्टसकडून खेळणारा सुशील सावंत हे दोन खेळाडू प्रॅक्टिस क्लबकडून खेळणार आहेत. तसेच फुलेवाडी संघाचा आघाडीचा खेळाडू सुमित जाधव व ‘शिवाजी’चा गोलरक्षक विशाल नारायणपुरे हे दोन खेळाडू ‘खंडोबा’कडून खेळणार आहेत. रोख व्यवहाराची चर्चा यंदाही चांगला पैसा कोणता संघ देईल, त्याच्याकडे जाण्याचा कल आघाडीच्या खेळाडूंमध्ये होता. त्यामुळे अनेक नामवंत खेळाडूंनी ४० ते ६० हजार रुपये संपूर्ण हंगामासाठी खेळण्यासाठी घेतले. त्याचबरोबर एका संघाने प्रत्येक खेळाडूची नोंदणी होतानाच खेळाडूची इच्छा असो अथवा नसो; त्या खेळाडूला प्रत्येकी पाच हजार रुपये रोख दिल्याची चर्चा फुटबॉल क्षेत्रात दिवसभर होती.
बालगोपालसह तीन संघांची नोंदणी
By admin | Updated: October 18, 2014 00:09 IST