शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

भाडेपट्टीची मुदत संपूनही तीन भूखंड वाऱ्यावर

By admin | Updated: July 3, 2015 01:44 IST

महापालिका : नगरसेवक न्यायालयात जाणार; राष्ट्रवादीत सुंदोपसुंदी

सांगली : महापालिकेने राष्ट्रवादीचे नेते तथा माजी महापौर सुरेश पाटील यांच्या संस्थांना नऊ वर्षे मुदतीने भाडेपट्ट्यावर दिलेल्या तीन मोक्यांच्या भूखंडांचा ताबा तीन वर्षांनंतरही प्रशासनाने घेतलेला नाही. याबाबत तीन महिन्यांपूर्वी आयुक्तांना पत्र देण्यात आले होते; पण आजअखेर कारवाई झाली नसल्याचे गुरुवारी उघड झाले. कोट्यवधींचे भूखंड वाऱ्यावर सोडल्याचा हा धक्कादायक प्रकार राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांनी चव्हाट्यावर आणला. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. मोक्याच्या भूखंडांची खुलेआम विक्री होत आहे. भूखंडांचा बाजार रोखण्यासाठी महापालिकेचे फलक लावण्याची तसदी प्रशासनाकडून घेतली जात नाही, अशा स्थितीत भूखंडांचे सरंक्षण करण्याची गरज आहे. अशात महापालिकेच्या माजी पदाधिकाऱ्यांकडील तीन भूखंड ताब्यात न घेतल्याने खळबळ उडाली आहे. २००३ मध्ये ऐनवेळच्या ठरावात सुरेश पाटील यांच्या संस्थांना हे भूखंड नऊ वर्षे मुदतीने भाडेपट्ट्यावर देण्यात आले आहेत. नेमिनाथनगर येथील प्राथमिक शाळा व क्रीडांगणासाठी आरक्षित असलेली जागा ए. बी. पाटील इंग्लिश स्कूलला दिली आहे. सर्व्हे नंबर ३६७/१ मधील प्लॉट नंबर ६१ च्या जागेवर महापालिकेने ग्रंथालयाची इमारत बांधून ती राजमती ट्रस्टला दिली आहे. याच जागेवर अनधिकृतपणे व्यायामशाळेचे बांधकाम करण्यात आले असून, ही व्यायामशाळा ट्रस्टने भाड्याने दिली आहे. तसेच कन्या महाविद्यालयासाठीही दहा गुंठे जागा नऊ वर्षे भाडेपट्ट्याने दिली आहे. या तिन्ही भूखंडांची नऊ वर्षांची मुदत संपून तीन वर्षे लोटली आहेत, तरीही हे भूखंड मालमत्ता विभागाने ताब्यात घेतलेले नाहीत. पुष्पराज चौकातील मिलेनियम होंडाच्या जागेत गोलमाल झाला आहे. ठरावानुसार इमारतीच्या तळमजल्यावरील दहा टक्के व पहिल्या मजल्यावरील पाच टक्के जागेचा ताबा महापालिकेकडे द्यायला हवा होता, पण या बहुमजली इमारतीतील चौथ्या मजल्यावरील जागा पालिकेकडे वर्ग करण्यात आली आहे. पालिकेने या जागेचा वापरच न केल्याने वर्षाला अडीच लाखांचे नुकसान होत आहे. याबाबत राष्ट्रवादीचेच नगरसेवक युवराज गायकवाड यांनी आयुक्तांकडे तक्रार करीत घरचा आहेर दिला आहे. पालिकेने कारवाई न केल्यास न्यायालयात फौजदारी दाखल करण्याचा इशारा गायकवाड यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत दिला. महिन्याभरापूर्वी तीन भूखंडांबाबत आयुक्तांना पत्र दिले आहे. तरीही कारवाई होत नाही. याविरोधात लवकरच न्यायालयात धाव घेणार असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)सामाजिक उपक्रमासाठी वापर या वादाबाबत सुरेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, हे तीन भूखंड आम्ही घशात घातलेले नाहीत. उलट त्यांचा सामाजिक उपक्रमासाठी वापर केला आहे. त्यापैकी इंग्लिश स्कूल व कन्या महाविद्यालयासाठी दिलेल्या क्रीडांगणाच्या भूखंडाचा वापरच होत नाही. ग्रंथालय व जीमची इमारत महापालिकेने बांधली असून, केवळ व्यवस्थापनासाठी आमच्याकडे आहे. तिचा चांगल्या पद्धतीने वापर होत आहे. भाडे मुदत संपल्याबाबत महापालिकेने आम्हाला कळविलेले नाही. शुक्रवारीच आम्ही पालिकेशी पत्रव्यवहार करून कागदपत्रांची पूर्तता करू. मिलेनियम होंडाची इमारत आम्ही विकसित केलेली नाही. या इमारतीतील गाळा आम्ही विकत घेतला आहे. त्यामुळे महापालिकेने ज्या बिल्डरला ही जागा विकसित करण्यासाठी दिली, त्याने कोणती जागा महापालिकेच्या ताब्यात दिली, याच्याशीही आमचा संबंध उरत नाही.