शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

निलेवाडीत महापुराच्या धास्तीने तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:21 IST

नवे पारगाव : वारणेच्या महापुराच्या धास्तीने निलेवाडी (ता. हातकणंगले) येथे तिघांचा मृत्यू झाला आहे. अख्खा गावच महापुराच्या विळख्यात व ...

नवे पारगाव : वारणेच्या महापुराच्या धास्तीने निलेवाडी (ता. हातकणंगले) येथे तिघांचा मृत्यू झाला आहे. अख्खा गावच महापुराच्या विळख्यात व स्थलांतरित झाल्यामुळे तिन्ही मृतदेहांचे त्यांच्या अंगणातच गावकर्‍यांनी अंत्यसंस्कार आटोपले. अविनाश शंकर जाधव (वय ६२), रेखा शंकर पाटील (वय २८) व पांडुरंग बाबू घाटगे (वय ८०) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

शनिवारी सकाळपासून दोन बोटींतून व दुपारनंतर एनडीआरएफच्या बोटीतून गावकऱ्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. पावसाने थोडी उसंत दिल्यामुळे वारणेची पाणीपातळी पाच फुटाने कमी झाली आहे. प्राप्त माहितीनुसार निलेवाडीत सध्या ३० जनावरे दगावली असून, २३ घरांची पडझड झाली आहे.

दरम्यान, शनिवारी निलेवाडीतील पूरग्रस्तांची माजी खासदार राजू शेट्टी, आमदार राजू आवळे, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, हातकणंगलेचे सभापती डॉ. प्रदीप पाटील, तहसीलदार प्रदीप उबाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजीराव पाटील यांनी भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

२४ निलेवाडी फोटो

फोटो ओळी : महापुराच्या संकटामुळे निलेवाडी (ता. हातकणंगले) येथील बहुसंख्य जनावरांचे बंगल्याच्या टेरेसवर स्थलांतर करून बळीराजाने आपले पशुधन जपले आहे. (छाया : दिलीप चरणे)