शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

मोहोळजवळ कंथेवाडीचे तिघे ठार

By admin | Updated: June 28, 2015 01:04 IST

दहा जखमी : जीपला ट्रकची धडक; तुळजापूरला देवदर्शनासाठी जाताना दुर्घटना

मोहोळ : पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन तुळजापूरच्या आई जगदंबेच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या जीपला येथून दीड किलोमीटर अंतरावर समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने समोरून जोरदार धडक दिल्याने तीन भाविक ठार झाले, तर १० जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास तांबोळे फाट्याजवळ घडला़ जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे़ या अपघातातील मृत व जखमी भाविक हे कंथेवाडी (ता़ राधानगरी, जि़ कोल्हापूर) येथील आहेत़ सुनीता तानाजी डवर (वय ३५), छाया लहू पाटील (४०), लक्ष्मण सुरेश पाटील (२६) अशी मृतांची नावे आहेत. मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंथेवाडी येथील डवर व पाटील परिवारातील १३ लोक देवदर्शनासाठी शुक्रवारी (दि. २६) पंढरपूर येथे आले होते़ पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन शनिवारी पहाटे ५ च्या सुमारास या भाविकांनी पंढरपूर सोडले़ अवघ्या ४५ मिनिटांत मोहोळ शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर आले असता, त्यांच्या जीपला (एम. एच. १४ पी ६४९१) मोहोळहून पंढरपूरकडे निघालेल्या ट्रकची (एम़ एच़ १३ आऱ ४५६६) समोरासमोर जोरदार धडक बसली़ या भीषण अपघातात सुनीता तानाजी डवर (वय ३५) या जागीच ठार झाल्या, तर सोलापूर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना चालक लक्ष्मण सुरेश पाटील (२६) व छाया लहू पाटील (४०) या दोघांचा मृत्यू झाला़ या अपघातात बाबूराव कृष्णा पाटील (५५), स्नेहा लहू पाटील (२०), आदेश लहू पाटील ( १८), तानाजी ज्ञानदेव डवर (४२), संजय बाबूराव डवर (३३), मयुरी शिवाजी डवर (११), सुहास संजय डवर (३), शिल्पा संजय डवर (२७), श्वेता शिवाजी पाटील (१९), सुभाबाई बाबूराव पाटील (५०) हे गंभीर जखमी आहेत़ यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे़ जखमींवर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ स्थानिक नागरिकांची मदत ट्रकच्या धडकेने जीपचा चक्काचूर झाला आहे़ पहाटे ५़४५ वाजता अचानक मोठा आवाज झाल्याने परिसरातील वस्तीवरील लोक जागे झाले़ या अपघातातील किरकोळ जखमी अवस्थेत असणारी स्नेहा पाटील यांनी जवळच असलेल्या गायकवाड वस्तीवर हा प्रकार सांगितला़ तेव्हा गायकवाड वस्तीवरील लोकांनी तातडीने जखमींना बाहेर काढले़ आणि पोलिसांना कळविले. अपघातानंतर ट्रकचालक गाडी सोडून पळून गेला़ ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहा़ पोलीस निरीक्षक काकासाहेब व्यवहारे करीत आहेत़ (वार्ताहर)