शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
4
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
5
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
6
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
7
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
8
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
9
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
10
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
11
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
12
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
13
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
14
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
15
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
16
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
17
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
18
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
19
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
20
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  

CoronaVirus Lockdown : ‘आनंद कोझी’च्या ‘कम्युनिटी किचन’चा तीनशेजणांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 12:06 IST

जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनच्या काळात परराज्यांतील कामगार, नागरिकांकरिता ‘कम्युनिटी किचन’ सुरू करण्याचे दानशूर कोल्हापूरकरांना हाक दिली होती. त्या हाकेस आनंद कोझी हॉटेलचे मालक आनंद माने यांनी प्रतिसाद देत रोज तीनशेजणांकरिता जेवणाची पॅकेटस् पुरविण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाच्या हाकेला प्रतिसादगेल्या चार दिवसांपासून जेवणाचे फूड पॅकेटचे वितरण

कोल्हापूर : जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनच्या काळात परराज्यांतील कामगार, नागरिकांकरिता ‘कम्युनिटी किचन’ सुरू करण्याचे दानशूर कोल्हापूरकरांना हाक दिली होती. त्या हाकेस आनंद कोझी हॉटेलचे मालक आनंद माने यांनी प्रतिसाद देत रोज तीनशेजणांकरिता जेवणाची पॅकेटस् पुरविण्यास सुरुवात केली आहे.शहरातील कदमवाडी, साळोखेनगर, एम.आय.डी.सी., उजळाईवाडी, कसबा बावडा, आदी परिसरात विविध राज्यांतील कामगार, नागरिक संचारबंदीमुळे अडकले आहेत. जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुक्यांत तीन ठिकाणी दानशूर संस्था, व्यक्तींना अशा नागरिकांकरिता कम्युनिटी किचन सुरू करून जेवण तयार करून देण्याचे आवाहन केले होते. त्यास लक्ष्मीपुरी येथील हॉटेल आनंद कोझीचे मालक आनंद माने यांनी तत्काळ प्रतिसाद दिला.

त्यानुसार त्यांनी आपल्या या हॉटेलमधून गेल्या चार दिवसांपासून रोज तीनशे लोकांकरिता जेवणाची पॅकेटस् पुरविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी स्वत: आनंद माने, माजी उपमहापौर अर्जुन माने, किरण माने, राजेंद्र पाटील, विठ्ठल पाटील, सुभाष जाधव, धैर्यशील भरणकर, अमित जाधव व हॉटेलमधील कर्मचारी वर्ग परिश्रम घेत आहेत.खास आचारीहॉटेलमधील नेहमीचे कुक घरात अडकल्यामुळे माने यांनी चपात्या करणाऱ्या चार महिला व दोन आचाऱ्यांची नेमणूक केली आहे. जेवण तयार केल्या जाणाऱ्या भटारखान्यात स्वच्छतेची सर्व मानके पाळली जातात. रोज वेगवेगळा मेन्यू जेवणात केला जातो.

यात पुलाव, मिश्र खिचडी, कोल्हापुरी मिक्स व्हेज, बटाटा, वांगे मिश्र भाजी, दोन चपात्या असे स्वरूप या जेवणाचे असते. त्याकरिता सकाळी सात वाजल्यापासून चपात्या करण्यास सुरुवात केली जाते. अकरा वाजता सर्व पॅकेटस् भरून तयार केली जातात. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आल्यानंतर ती खास गाडीतून त्या त्या ठिकाणी पोहोच केली जातात.

 

संचारबंदीच्या काळात राज्यासह परराज्यातील अडकलेल्या कामगार, नागरिकांच्या जेवणाची सोय व्हावी. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून या ‘कम्युनिटी किचन’ची सुरुवात चार दिवसांपूर्वी केली आहे. त्याकरिता सर्व साहित्य जिल्हा प्रशासन पुरवित आहे.- आनंद माने, माजी अध्यक्ष, चेंबर आॅफ कॉमर्स व मालक हॉटेल आनंद कोझी.

 

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर