शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

‘कळंबा’चे तीन गार्ड निलंबित

By admin | Updated: November 26, 2015 00:47 IST

कैद्यांची ओली पार्टी : कारागृह अधीक्षकांसह तुरूंग अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली

कोल्हापूर : येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात पुणे-मुंबईतील कैद्यांनी पंधरा दिवसांपूर्वी ‘पार्टी’ केल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये निष्पन्न झाले. हा प्रकार अतिशय गंभीर असून, कारागृह अधीक्षक सुधीर किंगरे यांच्यासह तुरुंगाधिकारी उत्तरेश्वर गायकवाड यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. सुरक्षारक्षक (गार्ड) विजय पंडितराव टिपुगडे, मनोज माधू जाधव व युवराज शंकर कांबळे या तिघांना निलंबित केल्याची माहिती पुणे कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. या कारागृहात पहिल्यांदाच एवढी मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय कारवाई झाली आहे. कारागृहातील मोकळ्या जागेत तीन विटा मांडून चूल करून त्यावर चिकन शिजत ठेवले आहे. यांतील एकजण मद्यप्राशन करीत आहे; तर दोघेजण कागदाची सिगारेटप्रमाणे गुंडाळी करून धूम्रपान करीत आहे, अशा दृश्याची क्लिप वृत्तवाहिनीवर प्रसारित झाल्याने राज्यभर खळबळ उडाली होती. या घटनेची वरिष्ठ पातळीवरून दखल घेत पुणे कारागृहच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांना चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्या मंगळवारी कोल्हापुरात आल्या. सर्वप्रथम कारागृह परिसराची पाहणी केली. ‘व्हिडीओ क्लिप’मध्ये दिसणाऱ्या ‘त्या’ कैद्यांना समोर बोलावून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी ‘पार्टी’ केल्याची कबुली दिली. त्यानुसार या पाचही कैद्यांवर शिस्तभंगाची कारवाई केल्याचे साठे यांनी सांगितले. कैद्यांनी तूप कोठून आणले, ते कारागृहात कसे नेले, त्यांना यामागे सहकार्य करणारे कर्मचारी कोण आहेत, याबाबत सखोल चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारागृह अधीक्षक सुधीर किंगरे यांची पुणे व तुरुंग अधिकारी उत्तरेश्वर गायकवाड यांची सांगली कारागृहाकडे तडकाफडकी बदली करण्यात आली. त्याचबरोबर सुरक्षारक्षक विजय टिपुगडे, मनोज जाधव, युवराज कांबळे या तिघांना निलंबित केले. तुरुंग अधिकारी एस. एम. सोनवणे व एस. एस. हिरेकर हे दोघेही या प्रकरणात दोषी आढळून आले असून, त्यांच्यावरही कारवाई करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर अहवाल पाठविला असल्याचेही साठे यांनी सांगितले. दारु, गांजानव्हे, शिराकैद्यांनी केलेल्या पार्टीमध्ये गांजा, दारू किंवा मटण मिळून आले नाही. त्यांनी तुपात शिरा शिजवित असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.शरद शेळके नवे कारागृह अधीक्षक कैद्यांच्या पार्टीचा दणका कारागृह अधीक्षक सुधीर किंगरे यांना बसला. कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी त्यांची पुणे येथील खुले कारागृहाकडे तडकाफडकी बदली केली. त्यांच्या जागी तत्काळ पुणे येथील शरद शेळके यांची नियुक्ती केली. शेळके यांनी मंगळवारीच येथील पदभार स्वीकारला. कैद्यांनी केलेल्या पार्टीची प्राथमिक चौकशी पूर्ण झाली आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली आहे. कारागृहात काही कैदी चोरी-छुपे मोबाईल वापरत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्यानुसार गोपनीय पातळीवर त्यांची चौकशी केली जाईल. प्रसंगी या प्रकरणात वेळ पडल्यास संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल. - स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पुणेकैद्यांनीच रचला कट४‘व्हिडीओ क्लिप’मध्ये दिसणारे कैदी बाळू चौधरी, किसन सोमा राठोड, अजिम अबू सलिम खान, गणेश देविदास शिंदे, बबलू जमीर यांची कसून चौकशी केली. ४कारागृहात काही अधिकारी व सुरक्षारक्षक कैद्यांना विनाकारण त्रास देत होते. कैद्यांना त्यांच्या मनासारखी वागणूक मिळावी, या उद्देशाने अधिकारी व सुरक्षारक्षकांना अद्दल घडविण्याचा निर्णय आम्ही घेतला. ४त्यानुसार पंधरा दिवसांपूर्वी पूर्वनियोजित कट रचून बाहेरून तुपाचा डबा छुप्या मार्गाने आतमध्ये आणला. ४त्यानंतर कारागृहात नाष्ट्याला दिलेला शिरा पाचजणांनी एकत्र करून तो चुलीवर शिजत ठेवला. तसेच कागदाची सिगारेटप्रमाणे गुंडाळी करून तंबाखू ओढून धुम्रपान केले. ४हे संपूर्ण दृश्य मोबाईलद्वारे क्लिक केले. त्यानंतर ही व्हिडीओ क्लिप प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचविल्याचे संबधित कैद्यांनी सांगितले.