शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

गुंड निसार नगारजीसह तिघांची धिंड

By admin | Updated: June 8, 2015 00:50 IST

खंडणी प्रकरण : खणभाग, पंचशीलनगरमध्ये फिरविले; घरावर छापे

सांगली : राष्ट्रवादीचे जिल्हा खजिनदार मुश्ताकअली रंगरेज यांच्याकडे पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेला गुंड निसार व त्याचे साथीदार आयुब पटेल व आयुब बारगीर या तिघांची रविवारी दुपारी खणभाग, बदाम चौक, शंभरफुटी व पंचशीलनगर परिसरात फिरवून धिंड काढली. तिघांच्या घरावर छापे टाकून पुन्हा झडती घेण्यात आली, मात्र हाती काहीच लागले नाहीत.पंधरवड्यापूर्वी नगारजी, पटेल व बारगीर यांनी रंगरेज यांच्या घरात जाऊन कऱ्हाड (जि. सातारा) येथील गुंड सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या याच्या मध्यस्थीने पाच लाखांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास कुटुंबास ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकारानंतर रंगरेज यांनी संजयनगर पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. यातील नगारजीला गेल्या आठवड्यात कर्नाटकातून अटक करण्यात आली होती. चार दिवसांपूर्वी पटेल व बारगीर यांना अटक केली आहे. सध्या तिघेही पोलीस कोठडीत आहेत. सल्या चेप्या याने अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. १५ जूनला त्याच्या जामिनावर अंतिम निर्णय आहे. तोपर्यंत न्यायालयाने त्याला तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे पोलिसांना त्याला अटक करता येत नाही.नगारजी पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याची गेल्या आठवड्यात धिंड काढण्यात आली होती. त्यानंतर रविवारी दुपारी पुन्हा त्याच्यासह बारगीर व पटेल यांची धिंड काढण्यात आली. खणभाग, नळभाग, मटण मार्केट व शंभरफुटी रस्ता, पंचशीलनगर येथे तिघांचे वास्तव्य असते. तसेच त्यांची या भागात दहशतही असल्याने या भागातून त्यांची धिंड काढली. प्रत्येक चौकात नेऊन त्यांचा खरपूस समाचार घेतला. ही कारवाई पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)तक्रारी कराव्यातधिंड काढण्यासाठी फिरवत असताना पोलिसांनी नगारजीसह तिघांनी काय गुन्हा केला आहे, याची माहिती नागरिकांना सांगितली. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, पुन्हा त्यांनी असा गुन्हा करु नये, यासाठी ही कारवाई सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. ते खंडणी अथवा अन्य कोणत्याही कारणासाठी धमकावत असतील, तर पोलिसांत तक्रार करावी, असे आवाहनही पोलिसांनी केले.