शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

कंटेनर-स्कूलबस अपघातात तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 06:17 IST

भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनरचा ताबा सुटल्याने तो दुभाजक तोडून स्कूल बसवर आदळून झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले; तर संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या २२ विद्यार्थ्यांसह २४ जण जखमी झाले

कोल्हापूर : भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनरचा ताबा सुटल्याने तो दुभाजक तोडून स्कूल बसवर आदळून झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले; तर संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या २२ विद्यार्थ्यांसह २४ जण जखमी झाले. कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर चोकाक येथे मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला.मृतांमध्ये बसचालक जयसिंग गणपती चौगुले (वय ४८, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर), कंटेनरचालक सुरेश गणपती खोत (४४, रा. लोणारवाडी, जि. सांगली ) व वाहक सचिन खिलारी (३०, रा. शेणवडी, ता. आटपाडी जि. सांगली) यांचा समावेश आहे.कंटेनर सांगलीहून कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. याचवेळी अतिग्रे येथील संजय घोडावत स्कूलची बस मुलांना घेऊन अतिग्रेच्या दिशेने निघाली होती. चोकाक येथे अचानक कंटेनर रस्ता दुभाजक फोडून विरुद्ध दिशेला घुसला. त्यामुळे स्कूलबस आणि कंटेनरची जोरदार धडक झाली. स्कूलबसमधील २२ विद्यार्थी व २ सहाय्यक जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.स्वत:चा जीव धोक्यात घालून बसचालकाने विद्यार्थ्यांना वाचविलेकंटेनरची धडक बसते असे वाटताच बसचालक जयसिंग चौगुले यांनी प्रसंगावधान राखून, स्वत:चा जीव धोक्यात घालत बस डाव्या बाजूच्या शेतवडीत घुुसवली. तरीही कटेंनर चालकाच्या बाजूने थोडासा घासलाच. यात चौगुले मृत्युमुखी पडले. हीच धडक समोरासमोर झाली असती तर मोठा अनर्थ घडला असता. चौगुले यांनी स्वत:चे प्राण गमावले मात्र विद्यार्थ्यांना वाचविले. चौगुले यांच्यामागे पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना अडीच लाख रुपये व मुलास भविष्यात संस्थेत नोकरी देण्याचे आश्वासन घोडावत समुहाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी दिले आहे.