इचलकरंजी : इयत्ता बारावी सायन्स विद्यार्थ्यांसाठी येथील डीकेटीई टेक्स्टाईल अॅण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटने ‘एमएचटी सीईटी २०२१’ यावर सलग तीन दिवस एक वेबिनार सीरिज आयोजित केले आहे. यामध्ये अनुभवी तज्ज्ञ या परीक्षेस कसे सामोरे जावे याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. सोशल मीडियावरून थेट प्रसारण करण्यात येणार आहे.
कोरोनामुळे सीईटी २०२१ या परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये बदल केला आहे. नव्या सूचनांनुसार या परीक्षा ४ सप्टेंबर ते १० सप्टेंबर २०२१ व १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२१ पासून घेण्यात येणार आहेत. १९ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२१ पर्यंत सकाळी ११ पासून सलग तीन दिवस वेबिनार सीरिज आयोजित केले आहे. वेबिनारमध्ये प्रा. दिनेश जोशी (ठाणे), प्रा.एम.सी. गायकवाड (कराड) व प्रा.बी.जी. मापारी (पुणे) हे अनुक्रमे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी १८ ऑगस्टपर्यंत सायंकाळी डीकेटीईशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रा.एस.ए. पाटील व प्रा.डॉ.ए.के. घाटगे यांनी केले आहे.