शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

तीन अंध पाच तास वाऱ्यावर स्वार!

By संदीप आडनाईक | Updated: December 4, 2018 04:18 IST

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पुण्याजवळील कामशेतजवळ तीन अंधांसह पाच जणांनी पॅराग्लायडिंग करीत हवेत झेप घेतली.

- संदीप आडनाईक कोल्हापूर : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पुण्याजवळील कामशेतजवळ तीन अंधांसह पाच जणांनी पॅराग्लायडिंग करीत हवेत झेप घेतली. कामशेतच्या परिसरात प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लार्इंड आणि निर्वाणा अ‍ॅडव्हेंचर्समार्फत या साहसी उपक्रमाचे आयोजन केले होते. प्रेरणाचे प्रमुख सतीश नवले यांनी १0 वर्षांपूर्वी ही संकल्पना मांडली होती. तिला निर्वाणा अ‍ॅडव्हेंचर्सचे संजय राव यांनी पाठबळ मिळाल्यानंतर मूर्त स्वरूप आले.कोल्हापूरचे सतीश नवले, पुण्याचे मिलिंद कांबळे आणि पूनम खुळे या तीन अंधांनी पॅराग्लायडिंगच्या साहाय्याने जवळपास १000 फूट उंचीवर पाच तास विहरण्याचा आनंद घेत दिव्यांग दिवस साजरा केला. त्यांच्यासोबत सुनील रांजणे आणि शिवाजी करडे या डोळस व्यक्तींनी होत्या. या साहसी उपक्रमासाठी निर्वाणाचे रवी शेलार, विनोद आणि बाळू या पायलटनी साहाय्य केले.सकाळी ८.३0 वाजता त्यांनी पॅराग्लायडिंगच्या साहाय्याने पहिली झेप घेतली. दुपारी १.३0 वाजेपर्यंत सर्वांनी या साहसाचा अनुभव घेतला. लेफ्ट आणि राईट कंट्रोल कसे करायचे, वॉकी टॉकीचा वापर, तसेच वातावरणातील बदल कसे झेलायचे याचे पूर्वप्रशिक्षण नसतानाही या दिव्यांगांनी हा थरार अनुभवला..हवेत झेप घेण्याची गंमत आम्ही अनुभवली. काही मर्यादा होत्या; पण आम्हा दृष्टिदिव्यांगांना पॅराग्लायडिंगची भीती वाटली नाही. अशा साहसी उपक्रमात सहभागी झाल्याने उलट आमचा आत्मविश्वास वाढला.- सतीश नवले, प्रमुख, प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड