शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

पिस्तूलसह तिघांना अटक

By admin | Updated: August 15, 2015 00:04 IST

संशयित पेठवडगावचे : लक्ष्मीपुरी पोलिसांची नाकाबंदीवेळी कारवाई

कोल्हापूर : शिवाजी पूल येथे लक्ष्मीपुरी पोलिसांनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पहाटे नाकाबंदी केली होती. यावेळी दोन मोटारसायकलवरून आलेल्या तिघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीच्या पिस्तूलसहीत ९ एम.एम.चे जिवंत राऊंडचे मॅगझिन आणि तीन मोबाईलसह २ लाखांचा मुद्देमाल सापडला. याप्रकरणी सतीश सिद्धेश्वर तोरगलकर (वय ४७, रा. मु. पो. घुमट गल्ली, पेठवडगाव, ता. हातकणंगले), राजू सर्जेराव जाधव (३४, रा. कैकाडी गल्ली, पेठवडगांव), संदीप प्रकाश माने (१९, रा. अंबाबाई मंदिराजवळ, पेठवडगांव, हातकणंगले) या तिघांना बेकायदेशीर, बिगर परवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक केली शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीपुरी पोलिसांच्या हद्दीत शिवाजी पूल येथे गुन्हे शोधपथकातील सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे व त्यांचे सहकारी अजिज शेख, भारत कांबळे , राहुल देसाई, विलास किरुळकर, अजित वाडेकर, विनायक फराकटे, संदीप कापसे, अभिजित व्हरांबळे, उदय काटकर, साजिद शिकलगार, सविता पानसरे हे नाकाबंदी करून गस्त घालत असताना रत्नागिरी रोडने शहरात येणाऱ्या दोन मोटारसायकलवरील तिघांना अडविले. त्यांची चौकशी करून झडती घेतली असता, त्यांच्याकडे ७५ हजार रुपयांच्या एका पिस्तुलाबरोबर ९ एम.एम. जिवंत राऊंड ८ नग, एक रिकामी मॅगझिन, १५ हजार किमतीचे तीन मोबाईल, ८० हजार किमतीची दोन दुचाकी वाहने असा एकूण २ लाख २० हजारांचा मुद्देमाल सापडला. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, तिघांवर भारतीय हत्यार कायद्यानुसार बेकायदेशीरपणे, बिगरपरवाना कब्जात बाळगणे, विक्रीसाठी हाताळणी करणे आदींनुसार कारवाई करण्यात आली. त्यातील राजू जाधवच्या विरोधात वडगांव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पिस्तूलसह तिघांना अटकसंशयित पेठवडगावचे : लक्ष्मीपुरी पोलिसांची नाकाबंदीवेळी कारवाईकोल्हापूर : शिवाजी पूल येथे लक्ष्मीपुरी पोलिसांनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पहाटे नाकाबंदी केली होती. यावेळी दोन मोटारसायकलवरून आलेल्या तिघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीच्या पिस्तूलसहीत ९ एम.एम.चे जिवंत राऊंडचे मॅगझिन आणि तीन मोबाईलसह २ लाखांचा मुद्देमाल सापडला. याप्रकरणी सतीश सिद्धेश्वर तोरगलकर (वय ४७, रा. मु. पो. घुमट गल्ली, पेठवडगाव, ता. हातकणंगले), राजू सर्जेराव जाधव (३४, रा. कैकाडी गल्ली, पेठवडगांव), संदीप प्रकाश माने (१९, रा. अंबाबाई मंदिराजवळ, पेठवडगांव, हातकणंगले) या तिघांना बेकायदेशीर, बिगर परवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक केली शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीपुरी पोलिसांच्या हद्दीत शिवाजी पूल येथे गुन्हे शोधपथकातील सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे व त्यांचे सहकारी अजिज शेख, भारत कांबळे , राहुल देसाई, विलास किरुळकर, अजित वाडेकर, विनायक फराकटे, संदीप कापसे, अभिजित व्हरांबळे, उदय काटकर, साजिद शिकलगार, सविता पानसरे हे नाकाबंदी करून गस्त घालत असताना रत्नागिरी रोडने शहरात येणाऱ्या दोन मोटारसायकलवरील तिघांना अडविले. त्यांची चौकशी करून झडती घेतली असता, त्यांच्याकडे ७५ हजार रुपयांच्या एका पिस्तुलाबरोबर ९ एम.एम. जिवंत राऊंड ८ नग, एक रिकामी मॅगझिन, १५ हजार किमतीचे तीन मोबाईल, ८० हजार किमतीची दोन दुचाकी वाहने असा एकूण २ लाख २० हजारांचा मुद्देमाल सापडला. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, तिघांवर भारतीय हत्यार कायद्यानुसार बेकायदेशीरपणे, बिगरपरवाना कब्जात बाळगणे, विक्रीसाठी हाताळणी करणे आदींनुसार कारवाई करण्यात आली. त्यातील राजू जाधवच्या विरोधात वडगांव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.