शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अमोल भास्कर सशस्त्र हल्ल्याप्रकरणी तिघे अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:30 IST

कोल्हापूर : जवाहरनगरातील अमोल भास्कर याच्या मोटारीचा महाद्वार रोडवर थरारक पाठलाग करून त्याच्यावर सशस्त्र हल्ला केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण ...

कोल्हापूर : जवाहरनगरातील अमोल भास्कर याच्या मोटारीचा महाद्वार रोडवर थरारक पाठलाग करून त्याच्यावर सशस्त्र हल्ला केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गुरुवारी तिघांना अटक केली. प्रदीप रामचंद्र कदम (वय २५), अजय सुनील माने (२८), सागर सुरेश जाधव (३३ सर्व रा. जवाहरनगर) अशी अटक केलेल्या संशयित हल्लेखोरांची नावे आहेत. अद्याप संदीप मोतीराम गायकवाड, रवि शिंदे, जावेद सय्यद, प्रकाश कुबेर कांबळे, अक्षय कदम (सर्व रा. जवाहरनगर) हे संशयित फरार आहेत.

दरम्यान, राहुल चव्हाणच्या खुनासाठी टीप दिल्याच्या रागातून आपल्यावर हल्ला केल्याची तक्रार अमोल भास्कर याने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली. बुधवारी सायंकाळी शिवाजी पेठ, महाद्वार रोड ते वाघबीळ रस्त्यावर हल्लेखोरांनी दुचाकीवरून तलवार, गज, कोयता, लोखंडी पाइप आदी हत्यारे घेऊन थरारक पाठलाग केला. हल्लेखोरांनी मोटारीच्या काचा फोडून नुकसान केले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जवाहरनगरातील अमोल महादेव भास्कर हा बुधवारी सायंकाळी शिवाजी पेठेत आपल्या मोटारीतून कामासाठी गेला होता. भास्कर याने आरसी ग्रुपचा प्रमुख राहुल चव्हाण याच्या खुनासाठीची टीप दिली, यासह कुटुंबीयाने रिअल इस्टेट व होलसेल किराणा व्यापारात केलेली प्रगती पहावली नाही या रागातून संशयितांनी त्याच्या मोटारीचा तलवार, कोयता, गज, लोखंडी पाइप घेऊन थरारक पाठलाग केला. पापाची तिकटी परिसरात मोटारीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. शिवाजी पूल ते वाघबीळ रस्त्यावर हल्लेखोरांनी मोटारीच्या काचा फोडल्या. त्यानंतर शिवीगाळ, दमदाटी करत धमकीही दिली, अशी फिर्याद मध्यरात्री अमोल भास्करने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद कांबळे, उपनिरीक्षक संदीप जाधव करीत आहेत.

जवाहरनगरात बंदोबस्त

घटना महाद्वार रोड व शिवाजी पुलानजीक घडली असली तरीही त्याचे पडसाद जवाहरनगरात दोन गुंडांच्या टोळ्यांत उमटण्याची दाट शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जवाहरनगरात बुधवारी रात्रीपासूनच कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

फोटो नं. २३०९२०२१-कोल-अजय माने (आरोपी)

फोटो नं. २३०९२०२१-कोल-सागर जाधव (आरोपी)

फोटो नं. २३०९२०२१-कोल-प्रदीप कदम (आरोपी)

230921\23kol_6_23092021_5.jpg~230921\23kol_7_23092021_5.jpg~230921\23kol_8_23092021_5.jpg

फोटो नं. २३०९२०२१-कोल-अजय माने (आरोपी)फोटो नं. २३०९२०२१-कोल-सागर जाधव (आरोपी)फोटो नं. २३०९२०२१-कोल-प्रदीप कदम (आरोपी)~फोटो नं. २३०९२०२१-कोल-अजय माने (आरोपी)फोटो नं. २३०९२०२१-कोल-सागर जाधव (आरोपी)फोटो नं. २३०९२०२१-कोल-प्रदीप कदम (आरोपी)~फोटो नं. २३०९२०२१-कोल-अजय माने (आरोपी)फोटो नं. २३०९२०२१-कोल-सागर जाधव (आरोपी)फोटो नं. २३०९२०२१-कोल-प्रदीप कदम (आरोपी)