शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटचे बेटिंग घेणार्‍या तिघांना अटक दीड लाखाचा माल जप्त : ताराबाई पार्कात गुन्हे शाखेची कारवाई

By admin | Updated: May 15, 2014 01:03 IST

कोल्हापूर : येथील गुरव मळा, ताराबाई पार्क येथील तीर्थ पॅराडाईज अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नं. ६०२ मध्ये आयपीएल क्रिकेटच्या रॉयल चॅलेंजर्स

कोल्हापूर : येथील गुरव मळा, ताराबाई पार्क येथील तीर्थ पॅराडाईज अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नं. ६०२ मध्ये आयपीएल क्रिकेटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स सामन्याचे मोबाईलवर लोकांकडून बेटिंग घेणार्‍या तिघा तरुणांना काल, मंगळवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. संशयित जवाहर रामचंद्र चंदवाणी (वय ५०, रा. ताराबाई पार्क), लखन श्रीचंद चुगानी (२४, रा. कोयना कॉलनी, गांधीनगर), महेश रामचंद्र आहुजा (३८, रा. न्यू शाहूपुरी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून १ लाख ३३ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलिसांनी सांगितले, गुरव मळा, ताराबाई पार्क येथील जवाहर चंदवाणी हा स्वत:च्या फ्लॅटमध्ये क्रिकेटचे बेटिंग घेत असल्याची माहिती खबर्‍याद्वारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहकार्यांसमवेत तीर्थ पॅराडाईज अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नं. ६०२ मध्ये छापा टाकला असता संशयित चंदवाणी, लखन चुगानी व महेश आहुजा हे तिघे मोबाईलवरून क्रिकेट बेटिंग चालवीत असताना रंगेहात मिळून आले. यावेळी त्यांच्याकडून रोख रक्कम तीन हजार, १२ मोबाईल, कॅलक्युलेटर, लॅपटॉप, मोटारसायकल, पॅड, बेटिंगचे आकड्याचे कागद असा सुमारे १ लाख ३३ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर या सर्वांना शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)