शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

माहिती मागणाऱ्यांना धमकी

By admin | Updated: March 23, 2016 00:36 IST

दबावतंत्राचा वापर : समाजकल्याणच्या ‘साकव’ची ‘अंकुश’ने मागितली माहिती

कोल्हापूर : जिल्ह्यातील आमदार, खासदारांची कामे आहेत, त्यामध्ये लक्ष घालू नका, असा धमकीवजा इशारा येथील समाजकल्याण विभागातून ‘साकव’ची माहिती मागितलेल्या ‘अंकुश’च्या महिला कार्यकर्त्यास मंगळवारी देण्यात आला. ‘जयसिंगपुरातून... पेपरचा पत्रकार बोलतोय’ असे सांगूनही हा इशारा देण्यात आला. तुम्ही ज्याच्याकडे माहिती मागितली आहे, तो इचलकरंजीतील गुंडांना माहिती देईल आणि तुम्हाला त्रास होईल, असेही त्या पत्रकाराने सांगितल्याचे त्या महिला कार्यकर्त्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शासनाच्या येथील समाजकल्याण कार्यालयातर्फे विशेष घटक योजनेतून झालेले साकव आणि वाटप करण्यात आलेल्या ट्रॅक्टरमध्ये लाखोंचा ढपला पाडल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या ‘अंकुश’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात बांधण्यात आलेले साकव, त्यांचे मूळ अंदाजपत्रक, कोणत्या गावात ते कुठे बांधले, ट्रॅक्टर वाटप केलेल्या बचत गटांची माहिती त्यांनी माहिती अधिकाराखाली मागितली. ही माहिती ३0 दिवसांत देणे बंधनकारक आहे. मात्र, ती दिली गेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अपील केले. अपिलात माहिती द्यावी लागणार म्हणून माहिती मागविण्यावरच दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यासाठी एका जयसिंगपुरातील एका स्थानिक वृत्तपत्राच्या पत्रकाराचा मध्यस्थ म्हणून वापर केल्याचेही समोर आले आहे.‘अंकुश’च्या कार्यकर्त्याचा मोबाईल क्रमांक मिळवून ‘तो’ पत्रकार फोन करून म्हणतो, तुम्ही समाजकल्याण विभागातून जी माहिती मागविली आहे त्याच्यात लक्ष घालू नका. तुमच्या मोठ्या फायद्याची गोष्ट आहे, येऊन भेटा, चर्चेला बसूया, माहितीच्या पाठीमागे लागलात तर इचलकरंजीतील गुंड त्रास देतील. बघा मिटवून टाका. हे त्याचे संभाषण ऐकून घेऊनही संबंधित महिला कार्यकर्त्याने त्यास चोख उत्तर दिले. त्या म्हणाल्या, आम्ही नियमांनुसार माहिती मागितली आहे. चुकीचे काम झाल्यास त्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहे.’ दरम्यान, अशा प्रकारे समाजकल्याण विभागातील ढपला मारलेल्यांकडूनच अप्रत्यक्षपणे दबाव, धमकी दिली जात असल्याचा आरोप ‘अंकुश’चा आहे. +गावपुढाऱ्यांची सोय...एका साकव मंजुरीसाठी ३० हजार आणि ट्रॅक्टरसाठी २२ हजार रुपये टेबलाखालून द्यावे लागतात, हे उघड गुपित आहे. अशा प्रकारे ढपला मिळाल्यानंतर शासनाचे नियम धाब्यावर बसवून साकव दलित समाजापेक्षा गावपुढाऱ्यांच्या घराकडे किंवा शेतांकडे जाणाऱ्या ठिकाणी बांधण्यात आले आहेत. त्यामुळे दलित वस्तीला जोडण्यासाठी साकव बांधणे हा मूळ उद्देशच बाजूला पडला आहे.साकवची माहिती मागितलेल्या ‘अंकुश’ संघटनेच्या महिला कार्यकर्त्यास जयसिंगपुरातून एका पत्रकाराचा फोन आल्याचे मला कळाले आहे. संघटनेने नियमांनुसार माहिती मागितली आहे. धमकी, दबावाला न बळी पडता माहिती मिळवून समाजकल्याणमध्ये भ्रष्टाचार झाला असल्यास आंदोलनाच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणू.- धनाजी चुडमुंगे, अध्यक्ष, अंकुश संघटना