शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मुश्रीफांच्या आमिषामुळे हजारो तरुण देशोधडीला

By admin | Updated: June 30, 2015 00:22 IST

संजय घाटगे : आमच्या कर्मचारी मुलांचे उत्तरदायित्व करायला आम्ही समर्थ

साके : मुश्रीफांनी निवडणुकीपूर्वी कारखान्यात फारच कमी कामगार लागत असतानाही हजारो तरुणांना नोकरीचे आमिष दाखविले. जिल्हा बँकेत घेतो आणि केडरमध्ये घेतो म्हणूनही अनेकांना पाठीमागून फिरवत त्यांचे संसार उद्ध्वस्त केले. स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून अशी सवय असणाऱ्या मुश्रीफांनी पहिल्यांदा या देशोधडीला लागलेल्या हजारो तरुणांच्या नोकऱ्यांचे बघावे. आमच्या कर्मचारी मुलांचे उत्तरदायित्व करायला आम्ही समर्थ आहोत, असा प्रतिटोला सोमवारी माजी आमदार संजय घाटगे यांनी लगावला.व्हनाळी (ता. कागल) येथे पत्रकारांशी ते बोलत होते. माझ्या व्यापामुळे आणि दुग्ध व्यवसायातील अस्थिरतेमुळे या क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या सात्ताप्पा महेकर यांना मी प्रकल्प यशस्वीरीत्या चालवण्याकरिता बरोबर घेतले आहे, असे स्पष्ट करून घाटगे म्हणाले, ज्यांनी आजपर्यंत संस्था केवळ मोडूनच खाल्ल्या, त्यांना यातले काय कळणार नाही. संताजी कारखान्याच्या उसाची बिले भागवा आणि मग आमच्या संस्थांची काळजी करा. जिल्हा बँक ताब्यात मिळाली, तर मुश्रीफ व त्यांच्या बगलबच्च्यांनी ती लुटून देशोधडीला लावली. यावेळी कै. माजी खासदार सदाशिवराव मंडलिकांनी प्रशासक आणला, म्हणून ती बँक वाचली. दुसऱ्याचे चांगले लुटून आणि मोडून खाण्याची सवय असणाऱ्या मुश्रीफांचा सार्वजनिक जीवनातला भ्रष्टाचाराचा पूर्वइतिहास पाहता शेतकरी हितासाठीच मी त्यांना बँकेत रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु संपूर्ण राष्ट्रवादीला जिल्ह्यातील नेत्यांच्या पुढे लोटांगण घालायला लावून ‘गोकुळ’मध्ये माझ्या पत्नीला उमेदवारी मिळू नये म्हणून केलेला अट्टाहास मुश्रीफ लगेचच विसरले....अन्यथा मुश्रीफ जेलमध्ये असतेमुश्रीफांच्या कर्तृत्वापेक्षाही कै. माजी खासदार मंडलिकांची पुण्याई पाठीशी होती म्हणूनच मुश्रीफ निवडून आले. नाहीतर ते स्वत:च्या हिमतीवर काहीच करू शकत नाहीत हे अलीकडच्या निवडणुकांवरून स्पष्टच झाले आहे. मुश्रीफांची कृष्णकृत्ये मंडलिकांच्या सावलीखाली झाकून गेली, अन्यथा आज मुश्रीफ जेलचीच हवा खात बसले असते, असेही संजय घाटगे म्हणाले.